विद्यार्थ्यांनी बघितला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:28 PM2017-11-28T23:28:21+5:302017-11-28T23:28:41+5:30

भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरा कसोटी सामना नागपूर येथील जामठा येथे पाहण्याकरिता तुमसर येथील जनता विद्यालयातील ५० विद्यार्थी तथा पाच शिक्षकांना विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पाचारण केले होते.

Students see international cricket match | विद्यार्थ्यांनी बघितला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

विद्यार्थ्यांनी बघितला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

Next
ठळक मुद्देएकमेव शाळेची निवड : जनता विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांचा समावेश

आॅनलाईन लोकमत
तुमसर : भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरा कसोटी सामना नागपूर येथील जामठा येथे पाहण्याकरिता तुमसर येथील जनता विद्यालयातील ५० विद्यार्थी तथा पाच शिक्षकांना विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पाचारण केले होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भारतीय व श्रीलंका संघाचा सामना बघितला. भंडारा जिल्ह्यातून एकमेव जनता विद्यालयाला ही संधी प्राप्त झाली होती.
नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या दुसरा कसोटी सामना पाहण्याकरिता जनता विद्यालयाच्या प्राचार्यांनी व्हीसीए प्रशासनाला परवानगी मागितली होती. आंतरराष्ट्रीय सामना पाहण्याकरिता व्हीसीए प्रशासनाने रितसर परवानगी दिली. यात रविवारी ५० विद्यार्थी व पाच शिक्षकांनी प्रत्यक्ष भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यानचा सामना बघितला.
विद्यार्थी विद्यार्थिनींनी क्रिकेट सामन्यांचा मनमुराद आस्वाद लुटला. भारताचा कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, रोहित शर्मा यांची फलंदाजी बघितली. व्हीसीए प्रशासनाने विद्यार्थ्यांना फराळ देऊन संबंधित अधिकाºयांनी विद्यार्थ्यांना क्रीडांगण व खेळाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम व परदेशी खेळाडू व भारतीय खेळाडू जवळून पाहिल्याचा क्षण शब्दात वर्णन करणे कठीण असल्याचे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. खेळाचे जीवनात अत्यंत महत्व असून खेळामुळे खेळाडूला किती लोकप्रियता प्राप्त होते हे प्रत्यक्ष क्रीडांगणावर दिसल्याचे जाणवले. प्रत्यक्ष त्यांच्या आवडीच्या खेळाडूला बघण्याची संधी प्राप्त झाल्याने आनंद गगणात मावेनासा झाल्याची प्रतिक्रिया चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिली. आम्हाला नक्कीच यातून प्रेरणा मिळाली अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांसोबत जनता विद्यालयाचे प्राचार्य ए.एन. लंजे, वाय.आर. कापगते, आर.पी. गभणे, अजय बोरकर, आर.आर. कापगते यांचा समावेश होता.

Web Title: Students see international cricket match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.