साहेब, पऱ्हे जगवायला तरी पाणी सोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:22 PM2019-07-17T22:22:21+5:302019-07-17T22:22:37+5:30

अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा सिंचन प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

Sir, leave the water to live on the planet! | साहेब, पऱ्हे जगवायला तरी पाणी सोडा!

साहेब, पऱ्हे जगवायला तरी पाणी सोडा!

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : नेरला उपसा सिंचन प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात संताप

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे. परंतु नेरला उपसा सिंचन प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. वारंवार शेतकरी कार्यालयात जाऊन विचारपूस करीत असताना नेमके पाणी कधी मिळणार याची माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नेरला उपसा सिंचन कार्यालयाबद्दल तिव्र संताप व्यक्त होत आहे.
अड्याळ परिसरातील सिंचनाची स्थिती बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. एकीकडे पावसाने ओढ दिले आहे तर दुसरीकडे अधिकारी म्हणतात, नेरला उपसा सिंचन सुरु होण्यासाठी पाण्याची २४१.२९ इतकी पातळी आवश्यक आहे.
पाण्याची पातळी उंचावल्यास पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्याकडून दिले जता आहे. मात्र निश्चित दिवस सांगीतला जात नसल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे करपू लागले आहेत. तरीदेखील प्रशासनाला जाग येत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी राजेंद्र ब्राम्हणकर यांच्यासह रस्त्यावर उतरुन पाण्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे. गोसे धरणाच्या पाण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. डावा व उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असताना अड्याळ परिसरात मात्र शेतकऱ्यांना पºहे जगविण्यासाठी वारंवार मागणी होत असताना अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या पाणी मागणीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहेत.
यापूर्वीच जर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन आवश्यक पाणीसाठा शिल्लक ठेवला असता तर शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळच निर्माण झाली नसती. परंतु अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे शेतकऱ्यांना पऱ्हे जगविण्यासाठी देखील ऐन खरीप हंगामात पाणी मिळण्याची चिन्हे दिसेनासे झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी एकत्र येऊन लवकरात लवकर पाणी न मिळाल्यास जिल्हाधिकाºयांसमवेत पाणी प्रश्नासाठी एक बैठक घेणार असल्याचे सांगितले.
उपसासिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न
आता प्रकल्पात पाण्याची पातळी किती दिवसात पूर्ण होणार आहे, याबाबत अधिकाऱ्यांना निश्चित माहिती नाही. त्यामुळे शेकऱ्यांना फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे नेरला उपसा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फक्त दिवास्वप्न ठरत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पाखाली जाऊनही शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न आजही प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्वरित मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

Web Title: Sir, leave the water to live on the planet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.