शार्ट सर्किटने जि.प. शाळेला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:29 PM2018-06-17T22:29:03+5:302018-06-17T22:29:17+5:30

येथील गांधी चौकात पोलीस ठाण्यासमोरील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला रविवारला (दि.१७) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात शाळेचे चार ते पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पवनी येथून आलेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आली.

Short circuits ZP School fire | शार्ट सर्किटने जि.प. शाळेला आग

शार्ट सर्किटने जि.प. शाळेला आग

googlenewsNext
ठळक मुद्देलाखांदूर येथील घटना : आगीत प्रयोगशाळेसह डेस्क, बेंच, खुर्च्या भस्मसात

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : येथील गांधी चौकात पोलीस ठाण्यासमोरील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला रविवारला (दि.१७) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात शाळेचे चार ते पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पवनी येथून आलेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आली.
जिल्हा परिषद शाळेच्या प्रयोगशाळेतून धुराचे लोट निघाले. त्यानंतर आगीच्या ज्वाळा निघाल्या. काही वेळाने ही आग पसरत बाजुच्या वर्गखोल्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर ही घटना शेजारी राहत असलेल्या लोकांना कळताच त्यांनी धाव घेतली. तोपर्यंत सर्वत्र आग पसरली होती. त्यामुळे ही आग लोकांना विझविता येऊ शकली नाही. त्यानंतर नगरसेवक हरीष बगमारे यांनी घटनास्थळ गाठून पवनी नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला बोलाविले. मात्र लाखांदूर ते पवनी हे अंतर दूर असल्यामुळे अग्निशमन वाहन पोहोचतपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या घटनेची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांना होताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून सर्वांना घटनास्थळी बोलविले. मुख्याध्यापक पुस्तोडे यांच्या माहितीनुसार, प्रयोगशाळेतील केमिकल किंवा शार्टसर्किटमुळे आग लागली असावी, असे सांगितले. या आगीत प्रयोगशाळेतील संपूर्ण साहित्य, वर्गखोल्यांमधील टेबल, पंखे जळून खाक झाले आहेत. यात अंदाजे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. पाच वाजता लागलेली ही आग सायंकाळी आठ वाजतापर्यंत धगधगत होती.
दरम्यान, जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे हे शाळा समितीचे अध्यक्ष म्हणाले, लाखांदूर तालुक्यात अग्निशमन वाहनाची सुविधा असती तर अशा घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविता आले असते, असे सांगून आता लाखांदूर येथे अग्निशमन वाहन देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले. यावेळी नायब तहसीलदार विजय कावळे, पोलीस निरीक्षक बन्सोडे, नगरसेवक हरीष बगमारे, देवानंद नागदेवे, मुख्याध्यापक पुस्तोडे यांच्यासह नागरिकांची गर्दी झाली होती.

Web Title: Short circuits ZP School fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.