रस्ता बनला रेतीचा डम्पिंग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:47 PM2017-10-31T23:47:14+5:302017-10-31T23:47:42+5:30

जिल्ह्यातील सर्वच रेतीघाट सध्या बंद आहेत. ३० सप्टेंबर रोजी रेतीघाटांची मुदत संपली. परंतु तुमसर तालुक्यातील डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे १५० ते २०० ब्रास रेतीचा अवैध साठा करण्यात आला आहे.

Road dump yard | रस्ता बनला रेतीचा डम्पिंग यार्ड

रस्ता बनला रेतीचा डम्पिंग यार्ड

Next
ठळक मुद्दे१५० ते २०० ब्रास रेती : डोंगरला-नवरगाव पांदण रस्त्यावर रेतीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जिल्ह्यातील सर्वच रेतीघाट सध्या बंद आहेत. ३० सप्टेंबर रोजी रेतीघाटांची मुदत संपली. परंतु तुमसर तालुक्यातील डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे १५० ते २०० ब्रास रेतीचा अवैध साठा करण्यात आला आहे. तलाठी व मंडळ अधिकाºयांचे संगनमत व तहसीलदारांचा आशीर्वादामुळे हा गोरखधंदा सुरू असल्याचे समजते. तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि़मी. अंतरावर हा प्रकार सध्या सुरू आहे. रेतीघाट बंद असल्याने ही रेती आणली कुठून व त्याची रॉयल्टी मिळाली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील रेतीघाटांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपला. रेतीघाट लिलावाची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. डोंगरला-नवरगाव पांदन रस्त्याशेजारी रेतीसाठा करून ठेवला आहे. अवैध रेती खननाचा हा प्रकार आहे. तामसवाडी रेती घाटातून अवैध रेती उपसा करून ठेवली का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोंगरला गावातही रेतीचे साठे असल्याचे समजते. रेतीसाठा करून ठेवणे गैर नाही. परंतु रेतीची रॉयल्टी आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. रेतीसाठा करण्याची पूर्वपरवानगी महसूल प्रशानाची घेतली का, हा खरा प्रश्न आहे.
तामसवाडी (सि.) व पांजरा रेती घाटावरून रात्रीच्या सुमारास सर्रास अवैध रेती खनन सुरू असल्याची माहिती आहे. रेती सार्वजनिक अथवा खाजगी कामाकरिता आणली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणातील रेती साठ्यांची शासकीय परवानगी नियमानुसार घेतली काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलाठी व मंडळ अधिकाºयांची येथे मुकसंमती दिसून येत असून या प्रकाराला तहसील प्रशासनाचे पाठबळ दिसून येत आहे. काही मंडळाकरिता एका नायब तहसीलदारांकडे ही जबाबदारी सोपविण्यात येते. रेती खनन गौण खनीज अवैध आहे का, याची चौकशी ते करतात. या प्रकाराची चौकशी कुणी केली हा संशोधनाचा विषय आहे. डोंगरला गावातील रेतीसाठा संशयाच्या भोवºयात आहे. कर्तव्यदक्ष व नियमावर बोट ठेऊन नियमांचा हवाला देणाºया तहसीलदारांनी येथे चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे.

Web Title: Road dump yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.