कुटुंबातील स्त्रियांप्रमाणेच अन्य महिलांचाही सन्मान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:00 PM2018-03-08T23:00:36+5:302018-03-08T23:00:36+5:30

आपण आपल्या परिवारातील स्त्रियांचा सन्मान करतो तसाच इतरत्र स्त्रियांचा सन्मान करा. स्त्री संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले आहे. स्त्रियांना स्वसंरक्षणासाठी जन्मजात हात, पाय, दात, नखे असे शस्त्र मिळाले आहेत.

Respect other women as well as women in the family | कुटुंबातील स्त्रियांप्रमाणेच अन्य महिलांचाही सन्मान करा

कुटुंबातील स्त्रियांप्रमाणेच अन्य महिलांचाही सन्मान करा

Next
ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख : महिलांनी प्रतिकार केल्यास अन्यायाला थारा नाही

आॅनलाईन लोकमत
भंडारा : आपण आपल्या परिवारातील स्त्रियांचा सन्मान करतो तसाच इतरत्र स्त्रियांचा सन्मान करा. स्त्री संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले आहे. स्त्रियांना स्वसंरक्षणासाठी जन्मजात हात, पाय, दात, नखे असे शस्त्र मिळाले आहेत. त्याचा महिलांनी प्रतिकारासाठी वापर केल्यास अन्याय करण्याची कुणीचीही हिंमत होणार नाही. संकटे तुडविण्यासाठी आपण जन्माला आलेला आहेत, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विजय उरकुडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते, अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्रुती शर्मा, आर.पी. पांडे, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव पी.पी. नयगावकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आंबेडोरे, माविमचे प्रबंधक झाडे उपस्थित होते.
यावेळी न्या.संजय देशमुख म्हणाले, सगळयात बुध्दी व ताकद कशामुळे मिळते, सगळयात मोठे विद्यापीठ कोणते, चांगली झोप कोठे मिळते अशा प्रकारचे मनोवैज्ञानिक प्रश्न विचारुन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. उपस्थित महिलांनी त्याची समर्पक उत्तरे देऊन बक्षिस मिळविले.
या मेळाव्यात न्या. श्रृती शर्मा, न्या. भट्टाचार्य, पी.एस. पटेल यांनी मनोधर्य योजना, सामाजिक क्षेत्रात होणारा लैगिक छळ व प्रतिबंधात्मक उपाय आणि कायदे, दबाव व भयकुम्त वातावरण या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, झाडे, पी. पी. नायगावकर यांची समयोचित भाषणे झाली.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या छाया कावळे, ज्योती चौधरी, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम-शितल गोंडाणे, द्वितीय -रिना मेश्राम, तृतीय- तेजेश्वरी कांबळे तर चित्रकला स्पर्धेत प्रथम- रिना मेश्राम, द्वितीय- स्नेहा मस्के, तृतीय- प्राची भोयर, रांगोळी स्पर्धेत प्रथम- रितीका भंगाळे, द्वितीय-निकिता केवट व तृतीय -प्रांजू धूडसे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मतदार कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्तिक मेश्राम यांनी पथनाटय सादर केले. संचालन आंबेडोरे यांनी तर आभारप्रदर्शन तलमले यांनी केले. या कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचारी, महिला, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Web Title: Respect other women as well as women in the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.