Request to District Collector of various organizations | विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
भंडारा : भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्यातील सूत्रधारांना अटक करून या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनेनी केली आहे.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, काँग्रेसचे प्रेमसागर गणवीर, वनकामगार संघटनेचे युवराज रामटेके, भाकपचे हिवराज उके, बसपाचे शशीकांत भोयर, बीआरएसपीचे हेमा गजभिये, पीरिपाचे निर्मला गोस्वामी, लोजपाचे दीपक डोंगरे, समता सैनिक दलाचे डी.एफ. कोचे, प्रशांत सुर्यवंशी, अजय तांबे, आतिश बागडे, महादेव मेश्राम, सम्राट अशोक सेनेचे तुळशीराम गेडाम, आहुजा डोंगरे, शरद खोब्रागडे, इंदिरा सतदेवे, मनिष वासनिक, धम्मशील चिंचखेडे, मानवाधिकार आयोगाचे प्रा.देवेंद्र सोनटक्के, महादेव मेश्राम, सचिन बागडे, किशोर मेश्राम, एम.डब्लू. दहिवले, संजय बन्सोड, अरूण अंबादे, वसंत हुमणे, मदन गोस्वामी, भारिप बमसंचे रणजित कोल्हटकर, हर्षल मेश्राम, पुरण लोणारे, उमराव डोंगरे, भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिसन सयाम, अशोक उईके, संदीप मेश्राम, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशनचे संजय मडावी, बबलू आत्राम, गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे गणपत मडावी, परमेश वलके यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.


Web Title: Request to District Collector of various organizations
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.