अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 09:37 PM2019-03-17T21:37:02+5:302019-03-17T21:38:14+5:30

केंद्र शासनाने घोषणा करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रति दिवस वेतन भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा लागू करण्यात येईल असे म्हटले होते. परंतू ते झाले नाही. तिन वर्षापासून अंगणवाडी केंद्रात लागणारे रजिस्टर व प्रवास भत्ता दिला नाही.

The problem of Anganwadi workers continued | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम

Next
ठळक मुद्देमोहाडीत कर्मचाऱ्यांची बैठक : मानधनवाढीचा प्रश्न निकाली निघेना

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : केंद्र शासनाने घोषणा करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रति दिवस वेतन भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा लागू करण्यात येईल असे म्हटले होते. परंतू ते झाले नाही. तिन वर्षापासून अंगणवाडी केंद्रात लागणारे रजिस्टर व प्रवास भत्ता दिला नाही. राज्य सरकारने मानधन वाढ कमेटीने केलेली मानधन वाढ शिफारस लागू केली नाही. असा आरोप जिल्हा अध्यक्ष सविता लुटे यांनी केला.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचा (आयटक) तालुका मेळावा बुध्द विहार मोहाडी येथे घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. मेळाव्याचे उदघाटन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष रिता लोखंडे यांनी तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे पुजन करून केले. कश्मिर येथे झालेल्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या जवानांना व मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना आदराजंली देण्यात आली. अंगणवाडी सेविकांना १५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविका १२५० रुपये व मदतनिसांना ७५० रुपये मानधनवाढ जाहिर केली. काही राज्यात ती लागू झाली. मात्र महाराष्ट्र शासनाने लागू केली नाही. असंघटीत कामगारावर अन्याय केला, असे प्रतिपादन सविता लुटे यांनी म्हटले.
अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न व शासनाची दुटप्पी भुमिका याबाबत संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. स्थानिक प्रश्नावर प्रकाश टाकीत सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रश्न जनश्री विमा योजना. स्टेशनरी, प्रवास भत्ता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी शालु कापसे, निर्मला बांते, लता वैद्य, आशा नंदनवार, संजू लोंदासे, आर्चना ढेंगे, वहिदा शेख, संगीता मारबदे, गौतमी धवसे, निर्मला भोयर, मंजुलता पराते यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्तविक अल्का बोरकर यांनी केले. संचालन फाईमा शेख तर आभार सुनिता कारेमोरे यांनी केले. मेळावासाठी जयश्री धांडे, माया मोटघरे, मेघा मोटघरे, लिला बडवाईक, अनिता ईटनकर, आशा मेहर, सुनिता मोटघरे, देवाला धांडे यांनी सहकार्य केले.

Web Title: The problem of Anganwadi workers continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.