रस्त्याचे खडीकरण अंदाजपत्रकाबाहेर

By Admin | Published: May 30, 2017 12:27 AM2017-05-30T00:27:26+5:302017-05-30T00:27:26+5:30

करडी गावात ग्रामपंचायत कार्यालयाचे वतीने आंबेडकर वॉर्डात तयार करण्यात आलेल्या खडीकरण रस्ता अंदाजपत्रकानुसार नाही.

Out of the road standing budget | रस्त्याचे खडीकरण अंदाजपत्रकाबाहेर

रस्त्याचे खडीकरण अंदाजपत्रकाबाहेर

googlenewsNext

करडी येथील ग्रामस्थांचा आरोप : उपविभागीय अभियंत्याकडे तक्रार, कारवाईकडे सर्वांचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडी गावात ग्रामपंचायत कार्यालयाचे वतीने आंबेडकर वॉर्डात तयार करण्यात आलेल्या खडीकरण रस्ता अंदाजपत्रकानुसार नाही. कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आलेला आहे. अंदाजपत्रकानुसार खडीकरण रस्ता ३.३० मिटर तयार करणे आवश्यक असताना ठेकेदारांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांशी साठगाठ करून अरुंद केलेला आहे. प्रकरणी ग्रामस्थांनी आमरण उपोषणही केले होते. तरीही ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानत कामात गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोप करीत कामाची तक्रार जि.प. उपविभागीय अभियंता खापा (तुपसर) यांचेकडे ग्रामस्थांनी केली आहे.
करडी गाव सध्या विविध गैरप्रकारांनी गाजत असून वेगवेगळ्या आंदोलनामुळे चर्चेत आहे. करडी गावातील खडीकरण रस्त्याचे बांधकाम नुकतेच करण्यात आले. या अगोदर सदर रस्त्याचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला. ८० एमएम खडी न टाकता मुरुम व पातळ थर खडीवर मोठ्या प्रमाणात मुरुम टाकून रस्त्याचे बांधकाम झाल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थांनी त्या बांधकामास विरोध करीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी व नंतर आमरण उपोषण केले. चौकशीसाठी दबाव निर्माण झाल्याने अखेर शाखा अभियंत्यांनी प्रकरणी चौकशी केली. चौकशीत ग्रामस्थांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने पुन्हा ८० एमएम खडी टाकून रस्ता तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु शाखा अभियंत्याने चौकशी अहवाल दिला नव्हता. आमरण उपोषण सुरु होताच प्रकरण अंगावर शेकण्याची चिन्हे दिसताच नागरिकांना चौकशी अहवाल देण्यात आला होता.
उपोषण सोडविताना अंदाजपत्रकानुसार खडीकरण रस्ता तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु उपोषण सुटताच कंत्राटदारांनी शाखा अभियंत्यांशी साठगाठ करीत रस्ता अंदाजपत्रकानुसार तयार केलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. रस्त्याचे बांधकाम ३.३० मिटरचे असणे आवश्यक असताना कुठे २.७०, २.८० तर कुठे २.९०, ३.०० मिटर तयार करण्यात आला. प्रत्यक्ष मोजमापातही तसेच आढळून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्ता मोठ्या प्रमाणात अरुंद तयार करण्यात आलेला आहे. रस्त्यावर मुरुमाऐवजी भिसारी माती टाकण्यात आलेली आहे.
दि. २५ मे २०१७ रोजी प्रत्यक्ष मोजणीचे वेळी कमी रुंदी असताना शाखा अभियंत्यांनी रस्ता ३.३० मिटरच असल्याचा दबाव टाकला.
तसेच तक्रारकर्ता ज्ञानेश्वर ढेंगे व ग्रामस्थांवर कंत्राटदार व अभियंत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाष्कर गाढवे, सीयाराम साठवणे हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा शाखा अभियंत्याबरोबर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. पंचायत समिती मोहाडीचे बांधकाम शाखा अभियंत्यांनी रस्त्याची मोजणी उपोषणकर्त्याला बोलावून न करता वेतन बिल तयार करण्याचा प्रयत्न चालविला आहे. करिता न्याय देण्यासाठी पुन्हा रस्त्याची मोजणी करण्यात यावी, त्यावेळी उपोषणकर्त्यांना बोलाविण्यात यावे, अशी तक्रार सार्वजनिक बांधकाम (जि.प.) उपविभागीय अभियंता तुमसर, कार्यकारी अभियंता भंडारा, उपमुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा, ग्रामपंचायत करडी यांना ज्ञानेश्वर ढेंगे, दिलीप पवनकर, अयुब शेख, शिवशंकर साठवणे, मंगेश शहारे व ग्रामस्थांनी दिली आहे.

रस्त्याचे बिल अजूनही काढण्यात आलेले नाही. रस्ता अंदाजपत्रकानुसारच व उपोषणकर्त्या तक्रारदारांच्या म्हणण्यानुसारच करण्यात आलेले आहे. विनाकारण काही लोकांनी निव्वळ विरोध करणे अनावश्यक आहे. परंतु बांधकाम करताना काही चुका झाल्या असल्यास त्यांच्या बिलातून रक्कम कपात केली जाईल.
-सुरेश मस्के, शाखा अभियंता, पंचायत समिती मोहाडी.

Web Title: Out of the road standing budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.