हरदोली-कर्कापूर मार्गावर विना रॉयल्टीचा मुरूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:49 PM2019-03-18T22:49:23+5:302019-03-18T22:49:45+5:30

हरदोली ते रेंगेपार गावापर्यंत नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. या रस्ता बांधकामात विना रॉयल्टीचा मुरूम उपयोगात आणला जात असल्याचा आरोप हरदोलीचे सरपंच आणि गावकऱ्यांनी तक्रारीतून केला आहे. यामुळे गावात प्रशासन विरोधात संताप निर्माण झाला आहे.

Murum of non-royalty on the Hardoli-Kirkapur route | हरदोली-कर्कापूर मार्गावर विना रॉयल्टीचा मुरूम

हरदोली-कर्कापूर मार्गावर विना रॉयल्टीचा मुरूम

googlenewsNext
ठळक मुद्देहरदोली गावाच्या शिवारात खड्डेच खड्डे : सरपंच आणि गावकऱ्यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : हरदोली ते रेंगेपार गावापर्यंत नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. या रस्ता बांधकामात विना रॉयल्टीचा मुरूम उपयोगात आणला जात असल्याचा आरोप हरदोलीचे सरपंच आणि गावकऱ्यांनी तक्रारीतून केला आहे. यामुळे गावात प्रशासन विरोधात संताप निर्माण झाला आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावापासून कर्कापूर, रेंगेपार गावापर्यंत नव्याने डांबरीकरण रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. रस्ता डांबरीकरणासाठी ४ कोटी रूपये मंजुर झाले असल्याची माहिती मिळाली आहे. या गावांना जोडणाºया पुर्वीच्या डांबरीकरण रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. नव्याने रस्त्याचे बांधकाम करताना गिट्टी आणि मुरूमाने खडीकरण करण्यात येत आहे. या कामाकरिता १२०० ब्रास मुरूमाचे खोदकाम विना रॉयल्टीने करण्यता आले आहे. ज्या जागेत मुरूम खोदकाम करिता मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. या नियोजित जागेतनू मुरूमाचे खोदकाम करण्यात आले नाही. परंतु हरदोली गावाचे शिवारातून बेधडक मुरूमाचे खोदकाम करण्यात आल्याने जिवघेणे खड्डे जागो जागी तयार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे राज्य शासनाचा महसूल बुडाला आहे. रस्ता डांबरीकरणाचे कंत्राट त्रिमुर्ती नामक कंपनीला असले तरी चोरीच्या मार्गाने मुरूमाचा उपयोग करण्यात येत आहे. या मुरूमाला रॉयल्टी असल्याची साधी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला नाही.
गाव हद्दीतून मुरूमाचे खोदकाम सुरू असताना महसूल विभागाची यंत्रणा बेखबर असल्यासारखे वागत आहे. या संदर्भात सुरूवातीला उपसरपंच रमेश कावळे यांनी महसूल विभागाचे यंत्रणेला सत्यता सांगितली आहे. यंत्रणा साधी चौकशी आणि कारवाई करित असल्याने हा स्थानिक गावकऱ्यांचा अवमान असल्याचा आरोप सरपंच नितीन गणवीर यांनी केला आहे. गावाचे हद्दीतून खुलेआम दिवसा ढवळ्या मुरूमाचे जेसीबी मशिनचे सहायाने अवैध खोदकाम करण्यात येत आहे.
विकासाला कुणाचा विरोध नाही. परंतु स्थानिक पातळीवर मुरूमाचे ट्रॅक्टर आढळून आल्यास महसूल विभागाची यंत्रणा कारवाई डोक्यावर घेत आहे. परंतु या बड्या कंत्राटदाराचे विरोधात कारवाई शुन्य आहे. रस्ता बांधकामात उपयोगात आणला जाणाºया मुरूमाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आहे.
रॉयल्टीच्या नावावर शासनाची दिशाभूल
सिहोरा परिसरात नव्याने रस्ता बांधकामाचे विकास कार्यांना मंजुरी मिळाली आहे. कामे जलद गतीने सुरू करण्यात आली आहे. परंतु मुरूमाचे रॉयल्टी काढताना महसूल विभागाचे डोळ्यात मिरचीची पुड घातली जात आहे. २०० ब्रास मुरूम खोदकामाची मंजुरी घेण्यात येत असताना २ हजार ब्रास मुरूम खोदकाम केले जात आहे. यामुळे यात आलबेल होत असल्याचा आरोप आहे.

हरदोली गावांचे हद्दीतून खोदकाम करणाºया मुरूमाची लीज काढण्यात आली नाही.बेधडक मुरूमाची चोरी होत आहे. चौकशी न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
-नितीन गणवीर,
सरपंच, हरदोली.

Web Title: Murum of non-royalty on the Hardoli-Kirkapur route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.