Molestation on 65-year-old lady in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात ६५ वर्षांच्या मतिमंद वृद्धेवर अत्याचार

ठळक मुद्देमंगरली येथील प्रकरणआरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जेवण देण्याच्या बहाण्याने ६५ वर्षीय मतिमंद महिलेवर बाथरुममध्ये नेऊन जबरी अत्याचार करण्यात आला. ही घटना तुमसर तालुक्यातील मंगरली येथे घडली.
दिनकर टिकाराम आस्वले (५३) रा.मंगरली असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १५ जानेवारीला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. पीडित वृद्धा ही मतिमंद असल्याची माहिती आरोपीला होती. तिला जेवण देण्याच्या बहाण्याने तो फिर्यादीच्या घरी गेला. यावेळी त्याने पीडित वृद्धेला स्वयंपाक खोलीत नेले व त्यानंतर बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. या घटनेने हादरलेल्या वृद्धेने आरडाओरड केल्याने घटनेची माहिती झाली. त्यामुळे या गंभीर व किळसवाण्या प्रकरणाची फिर्यादीने गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक किशोर झोटींग यांनी भादंवि ३७६ (२), (एल) अन्वये गुन्हा नोंदविला. दरम्यान आरोपी दिनकर आस्वले हा अटकेच्या भीतीने फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात शनिवारला त्याला अटक करण्यात आली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.