भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदुरात कँन्डल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:34 AM2018-04-20T00:34:54+5:302018-04-20T00:35:03+5:30

जम्मू- काश्मीर राज्यातील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी अत्याचार केला. या प्रकरणी जिल्ह्यातील लाखनी, पवनी, लाखांदूर, भंडारा येथे विविध पक्ष व नागरिकांच्यावतीने कँन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.

Mandal March in Bhandara, Lakhani, Pawni, Lakhandar | भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदुरात कँन्डल मार्च

भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदुरात कँन्डल मार्च

googlenewsNext
ठळक मुद्देनिषेध : महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटनेत वाढ, नराधमांना कठोर शिक्षेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी/ पवनी/ लाखांदूर/ भंडारा : जम्मू- काश्मीर राज्यातील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी अत्याचार केला. या प्रकरणी जिल्ह्यातील लाखनी, पवनी, लाखांदूर, भंडारा येथे विविध पक्ष व नागरिकांच्यावतीने कँन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.
लाखनी : येथे शिवरुद्रम युवा संघटनेच्यावतीने सर्व पक्षीय कँडल मार्च काढण्यात आला. याप्रसंगी नगर पंचायतचे उपाध्यक्ष धनु व्यास, अर्बन बँकेचे संचालक पप्पू गिऱ्हेपुंजे, उर्मिला आगाशे तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस, प्रिया खंडारे तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस, मोहन निर्वाण तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस, परवेज आकबानी, सलिम पटेल, जावेद लधानी तसेच शिवरुद्रम युवा संघटनेचे राज गिऱ्हेपुंजे, करण व्यास, प्रणय शामकुवर, पारस रंगारी, प्रतीक चेटूले, निखिल आत्राम, आकाश देशपांडे, सुयोग राघोर्ते व लाखनी शहरातील शेकडोंच्या संख्येने युवक युवती उपस्थित होते.
भंडारा : कठुवा आणि उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करुन न्याय देण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाºयांनी कँडल मार्च काढून गांधी चौक येथे निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी धनंजय दलाल, महेंद्र गडकरी, विनयमोहन पशिने, नितीन तुमाने, राजु हाजी सलाम पटेल, रविंद्र वानखेडे, प्रा. राजपुत, भोजराज वाघमारे, बाळा गभणे, सोनु खोब्रागडे, रुपेश खवास, अरुण अंबादे, उमेश ठाकरे, अमर उजवणे, प्रदीप सुखदेवे, मधुकर चौधरी, राजू साठवणे, जुमाला बोरकर, राजू सार्वे, लोकेश नगरे, अक्षय ब्राम्हणकर, नितीन खेडीकर, विष्णू कडीखाये, सुनिल शहारे, हिमांशु मेंढे, अक्षय रामटेके, संजय बन्सोड, चेतन वैद्य, किरीट पटेल, गणेश बाणेवार, अरविंद पडोळे, इकबाल खान, दाऊदभाई शहजादाभाई, मोनु गोस्वामी, राहुल वाघमारे, बबन मेश्राम, इरफान अली, मौसीन खान, ताहिरभाई, अबरारभाई, बल्लीभाई, किशोर इंगळे, असद इकबाल, भिमा रेवतकर, अमर उजवणे, सारिका साठवणे, कुंदा हलमारे, आशा हुकरे, गीता टंभुर्णीकर, देवला गभने, अश्विनी बुरडे, शुभांगी खोब्रागडे, पल्लवी झंझाड, दिशा झंझाड, लता वासुलकर, तनुजा बडवाईक, वर्षा कंकलवार, सरिता मदनकर, हर्षा वैद्य, काव्या वैद्य, सिध्दी वैद्य आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
पवनी : ‘बलात्काऱ्यांना फाशी द्या, आम्हाला न्याय दया, न्याय दया बेटीया मांगे सुकुन, इज्जत बचाने के हो सख्त कानून’ आदी घोषणा देत जम्मू कश्मीर मधील कठुआ, उत्तरप्रदेशच्या उन्नाव व गुजरातच्या सुरत येथे झालेल्या अत्याचार घटनेच्या विरोधात बुधवार रात्रीला कॅन्डल मार्च काढण्यात आला. याप्रसंगी तरुण, तरुणीनी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा व हत्याचा तिव्र विरोध केला.विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध धर्मातील तरुण तरुणी सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी चौकात मोठ्या संख्येने जमा झाले. नगराध्यक्षा पुनम काटेखाये यांच्या हस्ते मोमबत्ती पेटवून या कँडल मार्चची सुरुवात झाली. या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुण, तरुणी सहभागी झाले होते. या सर्वांच्या हातामध्ये पेटत्या मोमबत्त्या होत्या. या घटनांचा निषेध करुन आक्रोश व्यक्त केला जात होता. हा कँडल मार्च डॉ. आंबेडकर चौक, सराफा लाईन मार्गाने निघून गांधी चौकात समारोप झाला.
दोन मिनीटे मौन पाळून मृत पावलेल्या या घटनातील अल्पवयीन मुलींना या प्रसंगी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी श्रीकांत शहारे, विलास काटेखाये, पुनम काटेखाये, डॉ. राजेश नंदूरकर, विकास राऊत, मिर्झा शानुबेग, प्रकाश पचारे, कमलाकर रायपुरकर, शैलेश मयुर, डॉ. विक्रम राखडे, मनोहर उरकुडकर, पुनम हटवार, गोपाल नंदरधने, अनील धकाते, राकेश बिसने, माला समुद्रेकर, शबाना खान, चेतन जनबंधु, हर्षवर्धन सुखदेवे, अमोल नंदेश्वर, दशरथ धुर्वे, मनोहर मेश्राम, मनोज शेंडे, वैभव रामटेके, अरविंद अंबादे, स्वप्नील शेंडे, अमोल रामटेके, अनुप टेंभुरकर, हाशिम खान, अमीन शेख, आरीश खान, मोनु खान, जुबेर खान, रमीस खान, इलियास पटेल, मुस्तफा बेग, फैजान पटेल, तन्नू सय्यद, फरहान खान, शेरा खान, आनंद वहाने, प्रकाश भोगे आदींची उपस्थिती होती.
त्या आरोपींना फाशी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : जम्मु काश्मीर राज्यातील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी अत्याचार केला. या घटनेचा लाखांदूर तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध करून तहसीलदार संतोष महाले यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाद्वारे घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी देखील केली आहे.
ही घटना लज्जास्पद व माणुसकीला काळिमा फासणारी असून यातील दोषींना तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद आहे. यावेळी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदित्य बगमारे, गटनेता रामचंद्र राऊत, स्वप्नील ठेंगरीं, फिरोज छवारे, मेहबूब पठाण, शाबाद शेख, ऋषी लाडे, सचिन गुरनुले, स्वप्नील मेहंदळे, मंगेश राऊत, अराआ शेख यासह अन्य उपस्थित होते.

Web Title: Mandal March in Bhandara, Lakhani, Pawni, Lakhandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.