ग्रामस्थांनी ठोकले केसलवाडा ग्रामपंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:19 AM2018-03-23T00:19:13+5:302018-03-23T00:19:13+5:30

पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी,.....

The locals blocked the Keshavada Gram Panchayat | ग्रामस्थांनी ठोकले केसलवाडा ग्रामपंचायतीला कुलूप

ग्रामस्थांनी ठोकले केसलवाडा ग्रामपंचायतीला कुलूप

Next

विशाल रणदिवे ।
ऑनलाईन लोकमत
अड्याळ : पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. यात दिपसन गायकवाड यांच्या नेतृत्वात २० ग्रामस्थ सहभाग झाले असून ६० ते ७० वर्षे वयोगटातील वृध्द महिलांचाही यात समावेश आहे.
केसलवाडा गटग्रामपंचायत मधील गौण खनिज उत्खनन परवाना देताना सरपंच जिजाबाई चंदनबावणे व सचिव आर.खंडाईत यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेऊन परवाना दिल्याचा आरोप सिध्द होऊनही संबंधिताविरूद्ध कुठलिही कारवाई झाली झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये सात दिवसाचा अवधी दिला असून त्यात ते दोषी असल्याचेही म्हटले आहे. हा विषय गंभीररित्या हाताळण्यात आला असता तर ही वेळ आली नसती, अशा प्रतिक्रीया ग्रामस्थां समक्ष जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी यांनी दिली. याप्रकरणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.
गौण खनिज उत्खननाचा ठराव ग्रामसभेत घेतला जातो. हाच ठराव जिल्हा खनिकर्म कार्यालयात पाठविला जातो, असा नियम असताना सुध्दा हा ठराव घेण्यात आला. मासिक सभेत सादर केलेला हा ठराव व ग्रामसभेचा ठराव याची माहिती ज्यावेळी माहिती अधिकाराअंतर्गत ग्रामस्थांनी मागितली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभाग तथा अधिकाºयांना निवेदने दिले. परंतु याविषयी अधिकारी अनभिज्ञ असल्यामुळे ग्रास्थांनी ही भूमिका घेतल्याचे उपोषणकर्ता दिवसन गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एकीकडे गौण खनिज उत्खणन ठराव कोणत्या पध्दतीने होतात हेच अधिकारी सांगतात. त्यात ग्रामसभा नियमाचे उल्लंघन केले, असेही सांगतात. चौकशी अहवालातही सरपंच तथा ग्रामसेवक यांच्याविरूद्ध दोष सिध्द झाले असतानाही आजपावेतो कारवाई करण्यात आली नाही? असा प्रश्न करून ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा दिला होता. त्यानंतर तीन महिने संबंधित विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांनी पायपीट केली. परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The locals blocked the Keshavada Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.