शिक्षणासोबत शील असणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:33 PM2018-01-12T22:33:15+5:302018-01-12T22:33:33+5:30

शाळा महाविद्यालयीन शिक्षण ग्रहण करीत असताना आई-वडीलांना आदर्श, थोरा-मोठ्यांचे विचार, जुनी-नविन संस्कृती यांची सांगड घालुन पुढील येणाऱ्या नवीन पिढीला आदर्श घडविण्याचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांनी करावे.

It is important to have good education | शिक्षणासोबत शील असणे गरजेचे

शिक्षणासोबत शील असणे गरजेचे

googlenewsNext
ठळक मुद्देरासेयो शिबिराचा समारोप : राजकपूर राऊत यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : शाळा महाविद्यालयीन शिक्षण ग्रहण करीत असताना आई-वडीलांना आदर्श, थोरा-मोठ्यांचे विचार, जुनी-नविन संस्कृती यांची सांगड घालुन पुढील येणाऱ्या नवीन पिढीला आदर्श घडविण्याचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांनी करावे. अहंकार बाळगू नये. शिक्षण ग्रहण करीत असताना शील असणे आवश्यक आहे. नाही तर शिक्षणाला काहीच अर्थ राहत नाही, असे प्रतिपादन माजी समाज कल्याण सभापती राजकपूर राऊत यांनी केले.
ओम सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालय परसोडी-ठाणाद्वारे राजेदहेगाव येथील सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी सभापती राजकपुर राऊत बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक चंद्रशेखर गिरडे हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध श्यामकुंवर, सरपंच रामचंद्र लेंडे, ग्रामपंचायत सदस्य विणा लेंडे, बबीता हुमणे, परसोडीचे ग्राम पंचायत सदस्य कुलदीप कावळे, मुख्याध्यापक रामप्रसाद मस्के, तिघरे, प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील, प्रा. डॉ. वंदना मोटघरे, प्रा. प्रिती बागडे, प्रा. प्रतिक घुले उपस्थित होते.
मुख्याध्यापक रामप्रसाद मस्के म्हणाले की, सात दिवसीय रासेयो शिबिराच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना खुप काही शिकायला मिळाले. स्वच्छ भारत घडवायचा असेल तर मनापासुन तयारी असावी. सरपंच रामचंद्र लेंडे म्हणाले की, सात दिवसीय शिबिरामुळे गावातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकोप्याची भावना निर्माण झाली.
गावाचा विकास कसा केव्हा व कोठे करावा हे या रासेयो शिबिरातुन शिकायला मिळाले. शिबिराच्या माध्यमातुन आम्ही गावांचा विकास साधु. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर म्हणलो की, राज्यशासन व केंद्र शासनाद्वारे रासेयो कार्यक्रम घेऊन प्रत्येक गावात राबविणे आवश्यक आहे. जेणे करुन व्यक्तीमहत्व विकास व ग्राम स्वच्छता अभियान प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निर्माण होऊन गाव सुजलाम - सुफलाम होणार अध्यक्षीय भाषणात रासेयो कनिष्ठ जिल्हा समन्वयक चंद्रशेखर गिरडे म्हणाले की, ग्रामीण खेडेगावात विकास करण्याची समस्या भयावह आहे.
रासेयोच्या माध्यमातुन त्या-त्या गावातील प्रथम समस्याचा शोध घेऊन त्यांचे समतारुपी समाधान करणे रासेयो शिबिराच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे कर्तव्य आहे. माणसा-माणसातील दुरी निर्माण करणाºयाना दूर सारत माणूस जोडणारे निर्माण करा. याकरिता विद्यार्थ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण होणे काळाची गरज आहे. अपुºया साधन सामुग्रीद्वारे गाव विकास कसा साधता येईल, याचे साहित्य निर्माण करा.
सदर सात दिवसीय शिबिरात बौध्दीक चर्चा सत्र, व्यसनमुक्ती आणि आजचा युवक, महिला अत्याचार व बालगुन्हेगारी, महिलांचे अधिकार व फायदा विषयक माहिती अनुक्रमे प्रा. ज्योती रामटेके, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, महिला समुपदेशक मृणाल मुनेश्वर यांनी ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनच्या स्वयंसेवकांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रा. प्रतिक घुले यांनी केले. संचालन प्रा. आशा कांबळे यांनी केले. तर आभार प्रा. रंगारी यांनी मानले. सदर सात दिवसीय शिबिरासाठी ग्रामपंचायत राजेदहेगावचे पदाधिकारी सदस्य, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त गाव समिती, प्रतिष्ठीत नागरिक व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रिती बागडे, सहायक अधिकारी प्रतिक घुले, प्रा. रंगारी, प्रा.डॉ. वंदना मोटघरे रासेयोच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Web Title: It is important to have good education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.