संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:39 AM2018-08-10T00:39:26+5:302018-08-10T00:41:40+5:30

पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

For irrigated irrigation, 100 combustible water | संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी

संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : पेंच प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
अपुरा पाऊस व पावसाच्या खंडामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाने सिंचनासाठी उपयुक्त जलसाठ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केले.
मध्यप्रदेशातील चौराई येथे सिंचन प्रकल्पाच्या बांधकामामुळे यावर्षी तोतलाडोह व पेंच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा निर्माण झाला आहे. या प्रकल्पातून नागपूर शहर, नगरपालिका यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून सिंचनासाठी सुद्धा पाणी देण्यात येते. परंतु यावर्षी केवळ तोतलाडोह प्रकल्पात अत्यल्प टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
उपलब्ध जलसाठ्यामधून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १०० दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे झालेल्या बैठकीत पाण्याची उपलब्धता, पाणी मागणी लाभक्षेत्रातील पिकांची नाजूक अवस्था तसेच भात लावणीसाठी लागणारे अत्यावश्यक पाणी या बाबींचा विचार करता शेतीचे व पयार्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे खरीप हंगाम संरक्षित सिंचन आवर्तनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
पेंच प्रकल्पामध्ये सध्यास्थितीत पाणीसाठा कमी असलातरी पावसाळा कालावधीचे अद्याप ४० दिवस शिलल्क आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच वितरण आणि गळती थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.

Web Title: For irrigated irrigation, 100 combustible water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.