चप्राड येथे गौण खनिजांची अवैध चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:02 AM2019-04-29T01:02:07+5:302019-04-29T01:02:49+5:30

वैनगंगा नदी खोऱ्यात असणाºया चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असून, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे.

Illegal theft of minor minerals at Chaprad | चप्राड येथे गौण खनिजांची अवैध चोरी

चप्राड येथे गौण खनिजांची अवैध चोरी

Next
ठळक मुद्देकोट्यवधींचा महसूल बुडाला : महसूल विभागाच्या आशीर्वादाने माफियांचे धाडस वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : वैनगंगा नदी खोऱ्यात असणाºया चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असून, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे.
जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव लांबणीवर का गेले आहेत असा एकच प्रश्न नागरिकांत उपस्थित केला जात आहे. घाटांचे लिलाव झाले नसले तरी रेतीच्या मागणीत वाढ झाली आहे. चोरीच्या प्रकारातून रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने गावातील रेतीची मागणी विदर्भातील अनेक जिल्ह्यात होत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात रेती माफीयांचा उदय झाला आहे.यात रेतीमाफियांनी महसूल आणि अन्य विभागाचे कर्मचारी यांचेसोबत साटेलोटे केली आहे.
प्राप्त माहितीच्या आधारे, चप्राड गावाच्या बाहेर तीन ते चार ठिकाणी रेतीची डम्पिंग झालेली पाहायला मिळालेली आहे. यात दिवसाढवळ्या डम्पींग यार्डात रेतीचा उपसा केल्यानंतर या रेतीची विल्हेवाट रात्रभर केली जात आहे, अशी माहीती नागरिकांनी दिली.
ट्रक व ट्रॅक्टरच्या नियमित आवाजामुळे आमची झोप उडाली आहे. चुलबंद नदी ते चप्राडच्या कडेला गावाशेजारी, तलावात, शेतात तसेच टोली येथे मस्जिदच्या बाजूला, गावात काही ठिकाणी व आणखी दोन ते तीन ठिकाणी रेती डम्पिंग झालेली दिसली. यामुळे शेतशिवारातून जाणारे पांदन रस्ते रेतीच्या ट्रकांनी उखडली आहेत.
या विषयी अधिक माहिती घेतली असता गावातीलच लोकांनी या अवैध धंद्यांत गुंतलेल्या लोकांची यादी दिली. त्यानुसार चप्राड मधील चार ते पाच लोक, लाखांदूरातील दोन आणि चप्राड- मेंढा येथील दोन अशा प्रकारे लोक गुंतलेले दिसल्याचे नागरिकांनी माहिती दिली. ते अधिक माहिती देतांना म्हणाले, की पहाटे चार वाजतापासून ते सकाळी नऊ वाजतापर्यंत दहा ते पंधरा ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीचा अवैध धंदा केला जातो. सदर काम हे राजरोसपणे चालू आहे परंतु महसूल अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत आणि ही वस्तूस्थिती चप्राड मधीलच नाही तर संपूर्ण तालुक्याची आहे.
परिसरात डोक्याला ताप आणणारी रेतीचे चोरी असतांना वाहन जप्तीची कारवाई मोजकीच करण्यात आली. या व्यवसायात अधिक नफा असून जीएसटी देण्याचे भय नसल्याने मुळ व्यवसायाला तिलांजली देत रेतीच्या चोरीत चप्राड शिवारातीलच काही नागरीक गुंतले आहेत.
या प्रकरणात तहसील कार्यालयाकडून भेदभाव केला जात असल्याचे दिसून येते. संपूर्ण तालुक्यात जर विचार केला तर रोज १०० ते २०० ट्रिप रेती चोरीला जाते परंतु अधिकाऱ्यांचा अनभिज्ञतेनुसार केवळ महिन्यातून दोन ते चार गाड्या तहसील कार्यालयामध्ये जमा होतात बाकीच्या रेती चोरीच्या गाड्या पकडल्या का जात नाहीत, याविषयी चर्चा नागरिकांमध्ये आहे. लाखांदूर तालुक्यात खनिजांचे अवैध उत्खनन अनेक महिन्यापासून सुरु आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास महसूल प्रशासन धजावत नाही. खनीज उत्खननावर बाळा बसावा, यासाठी जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. तहसीलदार यांनी कायद्याच्या समानतेनुसार कार्य करावे अशी मागणी होत आहे.

महसूल विभाग अनभिज्ञ
चप्राड परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करण्यात येत आहे. हा प्रकार सर्वांना माहिती आहे. तलाठ्यांसह मंडळ अधिकारी या परिसरातून नेहमीच आवागमन करतात. परंतु त्यांना ही रेतीची चोरी दिसत नसावे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

प्रशासनाच्या वतीने अवैध उत्खनन करणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. यात कुठल्याही व्यक्तीवर भेदभाव केला जात नाही.निदर्शनास येणाºया प्रत्येकावर कारवाई करण्यात आली आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांना कारवाईसंबंधी निर्देश देण्यात आले आहेत.
-संतोष महाले, तहसीलदार, लाखांदूर.

Web Title: Illegal theft of minor minerals at Chaprad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू