गोसीखुर्द प्रकल्पाच्या कालव्यांची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:10 PM2019-01-09T22:10:45+5:302019-01-09T22:12:38+5:30

विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरासागर धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम संथगतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

Gosikhurd project canal works slow | गोसीखुर्द प्रकल्पाच्या कालव्यांची कामे संथगतीने

गोसीखुर्द प्रकल्पाच्या कालव्यांची कामे संथगतीने

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच : चौरास भागात डाव्या कालव्याचा एकही काम सुरु नाही

खेमराज डोये।
लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव (चौ.) : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरासागर धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम संथगतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
पवनी तालुक्यातील गोसे येथे १९८३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाची किंमत ३६२ कोटी रुपये होती. आता ३० वर्षानंतर या प्रकल्पाची किंमत सात हजार कोटीच्या वर गेली आहे. तीन नवे व मूळ धरणाच्या किमतीत २५ पटीने वाढ झाल्यानंतरही शेतकºयांपर्यंत या धरणातील पाणी पोहचणार नसेल तर याला काय म्हणावे. बिरबलाची खिचडीप्रमाणे या धरणाच्या कामाची प्रगती आहे. या धरणाचे काम पाहता आता पूर्णत्वाकडे पोहचलेले असले तरी या धरणातील कोट्यवधी टीएमसी पाण्याचा उपयोग शेतकºयांच्या शेतातील शेतीला अजिबात घेताना दिसत नाही.
आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे. या धरणातील पाण्याचे वितरण करण्यासाठी दोन कालवे तयार करण्यात आले आहेत. उजवा कालवा व डावा कालवा अशी दोन कालव्याची नावे आहेत. उजव्या कालव्याची लांबी १०३ किलोमीटर एवढी आहे. या कालव्यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा तलावापर्यंत पोहचत आहे. यात १२० दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध होत असून ६४ हजार हेक्टर सिंचनाची व्यवस्था केली आहे.
नव्याने बांधकाम करावे लागत असल्याने आतापर्यंतचा या कामावरील खर्चही वाया गेला आहे. ाा कालव्याची ४४१ कोटी रुपयाची अंदाजित किंमत असली तरी आतापर्यंतच्या हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.
मात्र एवढे होऊन डाव्या कालव्यापासून चौरास भागात ज्या बाजूला गेट लावून कालवे काढावयाचे आहेत तेही काम थंडबस्त्यात पडलेले आहे. त्यामुळे याहीवर्षी चौरास भागातील शेतकºयांना पाणी मिळण्याची आशा मावळलेली दिसत आहे. आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी हा आता खरा प्रश्न आहे. धरणाचे पाणीही नाही. विहिरीही फेल झाल्या. विजही कमी झाली.
डावा कालवा सापडला वादाच्या भोवऱ्यात
डाव्या कालव्याचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यातून सापडलेले आहे. हा कालवा गोसेपासून लाखांदूरपर्यंत आहे. या कालव्याची लांबी २२.९३ किलोमीटर आहे. तर सिंचन क्षमता ४०.२०६ हेक्टर आहे. या कालव्याचे काम उच्चप्रतीचे झाले नसल्याने हा कालवा पुन्हा बांधण्याचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरु आहे.

Web Title: Gosikhurd project canal works slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.