केंद्रावर बारदान्याचा वारंवार अर्धवट पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:05 PM2018-12-29T22:05:46+5:302018-12-29T22:06:43+5:30

सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत.

Frequent partial supply of baradona at the center | केंद्रावर बारदान्याचा वारंवार अर्धवट पुरवठा

केंद्रावर बारदान्याचा वारंवार अर्धवट पुरवठा

Next
ठळक मुद्देसिहोरा येथे धानाची खरेदी प्रभावित : कर्मचारी व शेतकरी त्रस्त, सोईसुविधांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत.
खरीप हंगामात धानाचे उत्पादन झाले असून शेतकऱ्यांची धान विक्रीत लूट थांबविण्यासाठी शासनाने धान खरेदी केंद्रांना मंजूरी दिली आहे. या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. परंतु या धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सिहोरा गावात सहकारी राईस मिलमध्ये शासकीय धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यमार्ग शेजारी असणाऱ्यां या केंद्रावर शेतकरी धानाची विक्री करीत आहेत. या केंद्रावर तीन गोडावून असल्याने धानाची पोती सुरक्षित असल्याची खातरजमा शेतकऱ्यांना आहे. केंद्रावर धानाची आवक वाढत असताना बारदान्याचा पुरवठा करताना कंजुशी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्याची वेळ येत आहे. बारदान्याची मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कर्मचारी आणि शेतकरी त्रस्त झाली आहे. धान खरेदी केंद्रांना मंजुरी देताना आधी पूर्वतयारी करण्याचे प्रयत्न दिसून येत नाही. अनेक दिवस केंद्रावर धानाची पोती पडून राहत असल्याने नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. परंतु कुणी या नुकसानीची जबाबदारी स्वीकारत नाही.
धानाची खरेदी प्रक्रियेला विलंब, मदतीत उशिर होत असल्याने शेतकरी नागवला जात आहे. धानाच्या पट्ट्यात गोडावूनचा अभाव आहे. धानाचे विक्रमी उत्पादन होत असताना प्रत्येक गावात नव्याने गोडावून निर्माण करण्यात येत नाही. यामुळे अवकाळी पावसाचे आगमन होत असताना या धानाला सुरक्षित उपाय देताना शेतकºयांना कसरत करावी लागत आहे.
दरम्यान गावात लोकप्रतिनिधी यांचे विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्ते, सभामंडप आदी वाटप करण्यात येत आहे. एकावर एक सिमेंट रस्ते तयार करण्यात येत असल्याने निधी खर्चाचा दुरुपयोग करण्यात येत आहे. सभामंंडप बांधकाम उपायोगाविना पडून आहेत. यामुळे धानाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रत्येक गावात ५० हजार पोती सुरक्षित ठेवणे तथा अवकाळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गोडावून निर्मितीची ओरड सुरु आहे. शेतशिवारात वर्षभर पिकांची सुरक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे पिकांना व उत्पादीत अन्न धान्यांना गावात संरक्षण मिळाले पाहिजे. या गोडावूनची जबाबदारी ग्रामपंचायतींना दिल्यास आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मदतीचे ठरणार आहे.

राईस मिलमध्ये शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर असले तरी बारदान्याचा वारंवार तुटवडा निर्माण होत आहे. धानाची वाढती आवक असताना अतिरिक्त बारदाना जलद गतीने उपलब्ध करण्याची गरज आहे.
-गंगादास तुरकर, अध्यक्ष, राईस मिल सिहोरा
धान पट्टा असणाºया या परिसरात गोडावूनचा अभाव आहे. प्रत्येक गावात गोडावून निर्माण केले पाहिजे. शेतकºयांचे उत्पादीत अन्न धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी मदतीचे होईल.
- मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ, सिंदपुरी
गोडावून निर्मितीमुळे निश्चितच ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढीसाठी मदतीचे ठरणार असून शेतकºयांचे धानाला गावातच संरक्षण मिळेल.
-वैशाली पटले, सरपंच, देवरी (देव)

Web Title: Frequent partial supply of baradona at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.