शेतकऱ्यांच्या रोषाला मिळाली विनम्रतेची ‘जोडणी’

By admin | Published: July 17, 2017 12:26 AM2017-07-17T00:26:30+5:302017-07-17T00:26:30+5:30

शासकीय कार्यालयाचा कार्यक्रम म्हटले की, त्यात अनेक तक्रारदारांच्या समस्या आल्याचं. अनेकदा अधिकारी हा स्वत:च्या

Farmer's Roles Attract Happiness 'Connection' | शेतकऱ्यांच्या रोषाला मिळाली विनम्रतेची ‘जोडणी’

शेतकऱ्यांच्या रोषाला मिळाली विनम्रतेची ‘जोडणी’

Next

ंपालांदुरात वीज ग्राहक मेळावा : अनेक समस्यांचा केला निपटारा, शेकडोंचे झाले समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : शासकीय कार्यालयाचा कार्यक्रम म्हटले की, त्यात अनेक तक्रारदारांच्या समस्या आल्याचं. अनेकदा अधिकारी हा स्वत:च्या गुर्मित तक्रारदारांना ठणकावित असल्याचेही चित्र दिसते. मात्र, पालांदूर येथे पार पडलेल्या वीज ग्राहकांच्या मेळाव्यात अधिकाऱ्यांचा कुठेही बडेजाव दिसून आला नाही. उलट संतप्त शेतकऱ्यांना विनम्रतेने उत्तर देऊन समाधान केले. त्यामुळे वीज अधिकाऱ्यांनी रोषावर विनम्रतेची ‘जोडणी’ केली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
यावेळी सरपंच शुभांगी मदनकर, कार्यकारी अभियंता राजेश नाईक, दामा खंडाईत, सहायक अभियंता पंकज आखाडे, धनंजय घाटबांधे, शामा बेंदवार, गजानन शिवणकर, यशवंत कठाणे, हेमंत सेलोकर, सुधीर राघोर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील वीज ग्राहकांनी आणलेल्या सर्व तक्रारीची नोंद घेऊन प्रत्येक तक्रारीचे निवारण केले. यावेळी दामा खंडाईत, सरपंच शुभांगी मदनकर यांनी वाढीव पोल, वाढीव बिल, नळ योजनेची अडचण मांडली. सरपंच शामा बेंदवार सरपंच धनंजय घाटबांधे यांनी कमी दाबाचा मुद्या उचलत नळयोजनेकरिता स्वतंत्र फिडरची मागणी केली. सुधीर राघोर्ते यांनी वाकलेले पोल तार यांना त्वरीत सरळ करण्याची मागणी केली. यशवंत हुमणे यांनी वीज कर्मचारी स्थानिक ठिकाणी निवाशी राहत नसल्याचे सांगितले. व्यक्तीगत स्तरावर वीज ग्राहकांनी गडेगाव-पालांदूर ३३ केव्हीची पुरवणी वाहीणीची मागणी, पंडित दिनदयाल योजनेला होत असलेला विलंब, भरमसाठ वाढलेले बिल, कृषी फिडरला दिवसा वीज पुरवठा, मेन्टनस करीता स्वतंत्र एजंसी, मऱ्हेगावला पालांदूरवरून वीज पुरवठा करावा, वापरलेल्या वीज युनिटचे बील द्यावे अन्य कोणतेही भार लावून बील देऊ नये, रोहित्रावरचा अतिरिक्त भाराचा मुद्या उपस्थित केला. कार्यक्रमाचे संचालन यंत्रचालक मोहन तिमांडे, प्रधान तंत्रज्ञ हिरामन बारई यांनी केले. कार्यक्रमासाठी मंदा कोल्हे, उमेश शेंडे, नरेंद्र पचारे, धांडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Farmer's Roles Attract Happiness 'Connection'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.