आगग्रस्त कुटुंबाने थाटला कोंडवाड्यात संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:50 AM2019-06-01T00:50:12+5:302019-06-01T00:50:33+5:30

तालुक्यातील तुडका येथे मधुकर वाडीभस्मे यांच्या घरी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. आगीने रौद्ररुप धारण करुन घराजवळील कुंदा पंधरेसह इतर तीन घरे जळाली. कुंदा पंधरे यांचे घर बेचिराख झाले. त्यांचा संसार उघड्यावर आला. घराचे छत जळाल्याने आता राहावे कुठे असा प्रश्न त्यांना पडला.

The family of the firefighter ran into the Kondwadi world | आगग्रस्त कुटुंबाने थाटला कोंडवाड्यात संसार

आगग्रस्त कुटुंबाने थाटला कोंडवाड्यात संसार

Next
ठळक मुद्देतुडका येथील प्रकार : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली वीज व पाण्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील तुडका येथे मधुकर वाडीभस्मे यांच्या घरी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. आगीने रौद्ररुप धारण करुन घराजवळील कुंदा पंधरेसह इतर तीन घरे जळाली. कुंदा पंधरे यांचे घर बेचिराख झाले. त्यांचा संसार उघड्यावर आला. घराचे छत जळाल्याने आता राहावे कुठे असा प्रश्न त्यांना पडला. विधवा कुंदा पंधरे व त्यांच्या दोन मुलांच्या मदतीकरिता ग्रामपंचायत पुढे सरसावली. त्यांनी कुंदाबाईला कोंडवाड्यात राहण्याकरिता जागा उपलब्ध करुन दिली. उर्वरित कुटूंबीयांनी गावातच नातलग तथा भाड्याने खोली केली.
कुंदाबाई सुरेश पंधरे यांच्या पतीचा चार वर्षापुर्वी मृत्यू झाला. मोलमजूरी करुन कुंदाबाई आपले पोट भरीत आहे. कुंदाबाईला एक मुलगा रोशन हा असून तो मजूरी करतो. रेशमा ही लहान मुलगी आहे. २५ मेच्या दुपारी कुंदाबाईच्या घराला आग लागली. बघता बघता संपूर्ण घर आगीत स्वाहा झाले. कुंदाबाईचे घर माती, कवेलू व लाकूड फाट्याचे होते. त्यामुळे घरातील अन्नधान्य, जीवनपयोगी वस्तु, कपडे, कागदपत्रे जळाली. दोन शेळ्यांचा आगीत मृत्यू झाला. केवळ आता भग्नकाळ्या भिंती तेवढ्या शिल्लक आहेत. आग विझविण्याकरिता पाण्याचा माºयात मातीच्या भिंतीला तडे गेले आहे.
केवळ घराचा सापळा तेवढा शिल्लक आता काय करावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. गावात भाड्याने घर घेतले तर महिन्याचे भाडे कुठून द्यावे हा प्रश्न उभा होता. तुडका येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांना मदतीचा हात पुढे केला. उपसरपंच उमेश थोटे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश मानापुरे, ग्रामपंचायत सदस्य शालु मानापूरे व इतर सदस्यांनी कुंदाबाईला गावातील कोंडवाड्यात संसार थाटण्यास सांगुन मदतीचा हात पुढे केला. कोंडवाडा अगदी नवीन असून बाजूला बोअर आहे. वीजपुरवठा सुरु करण्यात आला.
नियमानुसार कुंदाबाई पंधरेना घरकूल ग्रामपंचायत उपलब्ध करुन देणार, अशी ग्वाही पदाधिकाºयांनी दिली. समस्थ ग्रामस्थ कुंदाबाईच्या पाठीमागे येथे उभे झाले आहे. गावकरी ते राव न करी याचा प्रत्यय येथे आला आहे.
 

Web Title: The family of the firefighter ran into the Kondwadi world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग