रक्तदानासाठी कर्मचाऱ्यांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:28 PM2018-01-12T22:28:09+5:302018-01-12T22:28:59+5:30

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानाची गरज कुणालाही व कधीही पडू शकते ही भावना ठेवून अनेकजण रक्तदान करतात.

Employees' Compititon for Blood Donation | रक्तदानासाठी कर्मचाऱ्यांची झुंबड

रक्तदानासाठी कर्मचाऱ्यांची झुंबड

Next
ठळक मुद्देजि.प. कर्मचाऱ्यांचा पुढाकार : दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश

आॅनलाईन लोकमत
भंडारा : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानाची गरज कुणालाही व कधीही पडू शकते ही भावना ठेवून अनेकजण रक्तदान करतात. मात्र शुक्रवारला जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या पुढाकारातून युवा दिनाचे औचित्य साधून रक्तदान करण्यात आले. या माध्यमातून ४३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त अभिनव अभिवादन केले.
जिल्हा परिषद येथील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या औचित्यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्याचे जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाने ठरविले. त्यांच्या आयोजनानुसार आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढी चमूने यात सहभाग घेवून कर्मचाºयांना रक्तदानासाठी प्रेरीत केले.
दरम्यान जयंती कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, मुख्य लेखावित्त अधिकारी अशोक मातकर, समाजकल्याण अधिकारी विजय झिंगरे, कृषी विकास अधिकारी पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, कर्मचारी महासंघाचे प्रभाकर कळंबे, जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष केसरीलाल गायधने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान करण्याकरिता एकच गर्दी केली. मात्र काही कर्मचाऱ्यांना रक्तदान, शुगर आढळून आल्याने त्यांना रक्तदान न करता परत जावे लागल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य पसरले. दरम्यान ४३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून युवा दिनाचे महत्व विषद करण्यात महत्वाचा वाटा उचलला.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर यांनी रक्तदान करून अन्य कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी प्रेरणा निर्माण केली. यावेळी सुनिता मेहर या महिला कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले. यांच्यासह ४३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. अर्पणा जक्कल व त्यांच्या चमूने सहकार्य केले. रक्तदान शिबिराला सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी शंकर निशाने, विजय पवार, विशाल विघे, पांडूरंग चव्हाण, सचिन धाबेकर, विजय सार्वे, अनिल रामटेके, संजय पंचबुद्धे, रवी भुरे, प्रविण रामटेके, राहुल भोदे, सुधाकर चोपकर, विलास जेमती, संजय श्रीरामे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
पत संस्थेचे भरीव योगदान
या अभिनव रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने डायरी व पेन भेट देण्यात आली. सोबतच जिल्हा परिषद व पंचायत समिती सहकारी कर्मचारी पत संस्था व शासकीय ग्राहक कर्मचारी पतसंस्थेनेही आर्थिक सहकार्य करून रक्तदात्यांना पाठबळ दिले.

Web Title: Employees' Compititon for Blood Donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.