क्रिकेट सामन्यावर सट्टा, पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 09:56 PM2019-03-09T21:56:42+5:302019-03-09T21:57:06+5:30

भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरूअसल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशपूर येथील नेहरु वॉर्डात धाड टाकली. यात एका इसमाला अटक करून ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Cricket betting, police raid | क्रिकेट सामन्यावर सट्टा, पोलिसांची धाड

क्रिकेट सामन्यावर सट्टा, पोलिसांची धाड

Next
ठळक मुद्देएकाला अटक : ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरूअसल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशपूर येथील नेहरु वॉर्डात धाड टाकली. यात एका इसमाला अटक करून ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेशपूर येथील नेहरु वॉर्डात अमीत मनोहर उदापुरे नामक इसम हा सुरु असलेल्या भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा, बेटींग करीत असल्याची माहिती मिळाली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. मानकर यांनी सापळा रचून गणेशपूर येथे धाड घातली. यात अमीत उदापुरे याला मुद्देमालासह अटक केली. त्याच्या ताब्यातून ५ मोबाईल, १५ हजार रुपयांची रोख, हिशोब ठेवण्याचे रजिस्टर, एलईडी टिव्ही, सेटटॉप बॉक्स असा एकुण ८१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उदापुरे विरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र महाजन, पोलीस निरीक्षक सचिन गदादे, सहाय्यक फौजदार अश्विनकुमार मेहर, हवालदार तुलशीदास मोहरकर, पोलीस नायक विजय तायडे, निरंजन कढव, किशोर मेश्राम, शिपाई शैलेश बेदुरकर, पंकज भित्रे, अर्चना कुथे, सुप्रिया मेश्राम यांनी सहभाग नोंदविला.
मागीलवर्षीही स्थानिक गुन्हे शाखेला माहित न होता नागपूर पोलिसांनी भंडारा येथे क्रिकेट सामन्यांवर लावण्यात आलेल्या बेटिंग केंद्रावर धाड मारून मोठी कारवाई केली होती. याला प्रतिउत्तर म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जावून कारवाईला अंजाम दिला होता. तब्बल वर्षभरानंतर क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे क्रिकेटच्या सट्ट्यासह अन्य अवैध व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यावर नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांवर आळा घालण्याचे आव्हान आहे.

Web Title: Cricket betting, police raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.