काँग्रेस-राकाँचा सामाजिक समीकरणावर भर

By admin | Published: October 8, 2015 12:30 AM2015-10-08T00:30:59+5:302015-10-08T00:30:59+5:30

भारतीय जनता पार्टीच्या सत्ता केंद्राला हादरा देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे लढत ...

Congress-Rakappa emphasis on social equation | काँग्रेस-राकाँचा सामाजिक समीकरणावर भर

काँग्रेस-राकाँचा सामाजिक समीकरणावर भर

Next

सर्व ताकदीनिशी सर्व पक्ष मैदानात : मोहाडी नगरपंचायत सत्ता स्थापनेसाठी चढाओढ
राजू बांते मोहाडी
भारतीय जनता पार्टीच्या सत्ता केंद्राला हादरा देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे लढत असले तरी त्यांचे मोहाडी नगर पंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी सामाजिक समीकरणात गुंतली आहे.
आजपर्यंत मोहाडी ग्रामपंचायतवर काँग्रेसचे राज्य होते. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या गडाला भारतीय जनता पक्षाने खिंडार पाडले. भाजपाचा सरपंच बनला. त्यावेळी भाजपाला राष्ट्रवादीची साथ मिळाली होती. मोहाडीवर भाजपाचा झेंडा फडकला. महिला सरपंच बनल्या. त्यांनी अडचणीवर मात करून मोहाडीचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळले होते. परंतु काही सदस्यांच्या बाबतीत नाराजी दिसत होती. आता नगर पंचायतची निर्मिती होवून ग्रामपंचायत विसर्जित झाली. पुढव्या काही दिवसात नगर पंचायतच्या निवडणुका होणार हे लक्षात ठेवून भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष दमाने कामाला लागला आहे. मोहाडी येथे काँग्रेसची फळी मजबुत आहे. याच हिमतीवर काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येण्याचा निर्धार केला आहे. आज मोहाडी काँग्रेस पक्षासाठी अनुकूल असले तरी भाजपाचे तगडे आवाहन आव्हान काँग्रेसला पेलावे लागणार आहे.
कारण, केंद्र, राज्य तसेच मोहाडी पंचायत समितीवर भाजप आहे. याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपाला होवू शकतो. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे हे भाजपाचे असल्यामुळे मोहाडी नगर पंचायत निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. काँग्रेसमध्ये दोन समाजाचे स्थानिक नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वात नगर पंचयतची निवडणूक लढविली जाणार आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचेही अस्तित्व आहे. या निवडणुकीत समर्थपणे लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष तयार झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, आमदार राजेंद्र जैन व राष्ट्रवादीची जिल्ह्यातील मंडळी मोहाडी नगर पंचायतच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. मोहाडी नगर पंचायत निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष उत्स्तुक आहे.
भाजपाचा मित्र पक्ष शिवसेना मोहाडीत पहिल्यांदाच लढत आहे. शिवसेना या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. पण, मोहाडीत शिवसेनेची बांधणी मजबूत नाही. त्यामुळे शिवसेना प्रत्यक्षपणे भाजपाला ऐनवेळी मदत करते की विरोधात भक्कपणे उभी राहील याचा अंदाज आताच लावता येत नाही. पण, सत्ता जोड-तोडसाठी शिवसेनेचे मते निर्णायक राहणार असल्याचे दिसून येते. तथापि, मोहाडी येथे होणारी नगर पंचायत निवडणूक काँग्रेस व भाजपात सरळ लढत होण्याची अधिक शक्यता आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस गुरूवार आहे. यादिवशी उमेदवारी अर्ज सगळेच पक्षाचे उमेदवार करणार आहेत. उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची दमछाक होत आहे. भाजपा व काँग्रेस आपले १७ ही उमेदवार उभे करतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेला पूर्ण उमेदवार उभे करण्यासाठी उमेदवारांचा अजूनही शोध घ्यावा लागत आहे. उमेदवारीसाठी भाजपामध्ये काही प्रमाणात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काँगे्रसने सामोपचाराने उमदेवार ठरवित आहे. मोहाडीत सर्व पक्षासमोर एकच प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे प्रभाग ९ व प्रभाग १२ मध्ये उमेदवार कोण द्यावा.
प्रभाग ९ अनुसूचित जमाती खुला, प्रभाग १२ अनुसूचित जमाती स्त्री राखीव यांच्यासाठी आहे. मोहाडीत एस.टी. समाज कमी आहे. एस.टी.मध्ये गोंड जातीचा समावेश होतो. आता हलबा समाजाला एस.टी. प्रवर्गाची जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे ही अडचण सर्वच पक्षांसमोर उभी आहे.

Web Title: Congress-Rakappa emphasis on social equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.