अर्धनग्न करून १२ तरूणांच्या मारहाणीची तक्रार राष्ट्रपतींकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 09:58 PM2019-01-18T21:58:40+5:302019-01-18T21:59:38+5:30

चिखला भूमिगत खाण परिसरात १२ आदिवासी तरूणांना अर्धनग्न करून मारहाण केल्याप्रकरणाची तक्रार आदिवासी कृती समितीने थेट राष्ट्रपतींकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Complaint to the President | अर्धनग्न करून १२ तरूणांच्या मारहाणीची तक्रार राष्ट्रपतींकडे

अर्धनग्न करून १२ तरूणांच्या मारहाणीची तक्रार राष्ट्रपतींकडे

Next
ठळक मुद्देआदिवासी कृती समितीचे निवेदन : अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : चिखला भूमिगत खाण परिसरात १२ आदिवासी तरूणांना अर्धनग्न करून मारहाण केल्याप्रकरणाची तक्रार आदिवासी कृती समितीने थेट राष्ट्रपतींकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तुमसर तालुक्यातील चिखला व परिसरात १२ तरूण वनविभागाच्या जागेवर मार्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. चिखला येथील सुरक्षा रक्षकांनी या तरूणांना ताब्यात घेवून त्यांना अर्धनग्न करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ व्हॉयरल केला. त्यामुळे त्यांची गावात, समाजात बदनामी झाली. यातील काही युवक अनुसूचित जमातीचे आहे. त्यामुळे याप्रकरणी अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. चिखला भूमिगत खाणीत अनेक अनियमित कामे सुरू आहेत. ती लपविण्यासाठी मॉईलच्या अधिकाऱ्यांनी निरपराध युवकांना फसविण्याचा हा केविलवाना प्रयत्न केला आहे. चिखला व डोंगरी येथील मॉईल खाणीमध्ये स्थानिक युवकांना शिकाऊ व कायमस्वरूपी नौकरी दिली नाही. आदिवासींच्या जमिनीवर मॉईलने अतिक्रमण केले आहे. डोंगरी बुजरूक व चिखला मॉईलने सुमारे ३१० एकर वनजमिनीवर अवैधरित्या डम्प केला आहे. सदर अतिक्रमण काढण्यात यावे, कमी ग्रेडचा डीओ काढला जातो व त्यांना अप्परग्रेडचा मॅग्नीज दिला जातो. येथे आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. सीएसआर अंतर्गत एनजीओ व काही अधिकारी संगणमत करून आर्थिक गैरव्यवहार करीत आहेत. कंत्राट पद्धतीने किमान मजुरी न देता कंत्राटदार व अधिकारी संगणमत करीत असल्याने या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खाण व्यवस्थापक आनंद चौकसे, मॉईल अभिकर्ता राजेश भट्टाचार्य, सुरक्षा अधिकारी राजू शेख, अली शाहिद, पांडूरंग कोटांगले, शिवा मुदलीयार, शत्रृघ्न चौधरी, राजेश डोंगरे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
मॉयल म्हणते 'तो व्हिडीओ' शारीरिक कवायतीचा
मॉयलच्या चिखला खाणीतील प्रतिबंधीत क्षेत्रात आढळलेल्या १२ युवकांना अर्धनग्न करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. यासंबंधीचा व्हिडीओ शोशल मिडियावर व्हायरल झाला होता. सदर व्हिडीओ हा युवकांच्या शारीरिक कवायतीचा असल्याचे मॉयल प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. मॉयलच्या चिखला प्रतिबंधीत क्षेत्रात ३ जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजता काही युवक सुरक्षा रक्षकांना आढळून आले. त्यातील १२ युवकांना ताब्यात घेण्यात आले. त्या युवकांवर मॅग्नीज चोरीचा संशय असल्याने पोलिसात देण्याची तंबी देण्यात आली. त्यावेळी युवकांनी सुरक्षा कर्मचाºयांची माफी मागून पोलिसांच्या ताब्यात न देण्याची विनंती केली. त्या तरूणांच्या भविष्याचा विचार करता केवळ शारीरिक कवायती करून त्यांना सोडून दिले. मात्र काही असामाजिक घटकांनी सदर प्रकरणाची चित्रफिती काढून ती शोसल मिडियावर टाकून मॉयल प्रशासनाच्या विरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केल्याचे या निवेदनातून स्पष्ट केले आहे.
२३ जानेवारीला आंदोलन
सदर प्रकरणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर २३ जानेवारी रोजी जनआंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, काँग्रेसचे युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे, माजी सरपंच तोपलाल रहांगडाले, अनिल टेकाम, वसंत बिटलाये, कमलाकर निखाडे, लक्ष्मीकांत निनावे आदी उपस्थित होते.

Web Title: Complaint to the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.