बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

By admin | Published: July 2, 2017 12:21 AM2017-07-02T00:21:52+5:302017-07-02T00:21:52+5:30

लोकमत वृत्तपत्र समूह व लाईफलाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त...

Blood donation camp today on the occasion of Babuji's birth anniversary | बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

बाबुजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर

Next

रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकमत वृत्तपत्र समूह व लाईफलाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत श्रीगणेश हायस्कूल, राजीव गांधी चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, युवती, नागरिक, सेवाभावी, शासकीय, खासगी संस्था, समाजसेवक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक रक्तदात्यास रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येईल. या रक्तदान अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत समूहातर्फे करण्यात आले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी कार्यक्रम संयोजक ललीत घाटबांधे (९०९६०१७६७७), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२ यांच्याशी संपर्क साधता येईल.

Web Title: Blood donation camp today on the occasion of Babuji's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.