नवमतदार नोंदणीमध्ये भंडारा जिल्हा राज्यात उत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 10:06 PM2017-09-26T22:06:38+5:302017-09-26T22:07:18+5:30

५ जानेवारीनंतर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात तीनही विधानसभा मतदारसंघात २०, ७१५ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली.

Bhandara District is the best in the newly registered registration | नवमतदार नोंदणीमध्ये भंडारा जिल्हा राज्यात उत्कृष्ट

नवमतदार नोंदणीमध्ये भंडारा जिल्हा राज्यात उत्कृष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांची माहिती : २० हजार नवीन मतदार वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ५ जानेवारीनंतर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात तीनही विधानसभा मतदारसंघात २०, ७१५ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. १६,२६० मतदार विविध कारणाने वगळण्यात आले असून यात ११ हजार ४६४ मृत मतदारांचा समावेश आहे. या विशेष कार्यक्रमानंतर जिल्ह्यात ९ लाख ९८ हजार ९४ इतकी मतदार संख्या झाली आहे. नवमतदार नोंदणीमध्ये राज्यात ज्या जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केलेले आहे त्यात भंडारा जिल्ह्याचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
१ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम त्यांनी यावेळी जाहीर केला. ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध मतदार यादीनुसार तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा मतदार संघातील १९९० मतदान केंद्रात एकूण ९ लाख ३९ हजार ६३९ मतदार होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ही संख्या ९ लाख ९८ हजार ९४ मतदार इतकी झाली. यात वाढलेले मतदार २० हजार ७१५ व वगळलेले मतदार १६ हजार २६० यांचा समावेश आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या विधानसभा मतदारसंघात १ जानेवारीला आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्राप्त झालेला असून कार्यक्रमाचे वेळापत्रक याप्रमाणे आहे.
३ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी, ३ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबरपर्यंत मतदार यादीमधील संबंधित भागाचे, सेक्शनचे ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्लूए सोबत बैठक आणि नावाची खातरजमा करणे, ८ आॅक्टोबर ते २२ आॅक्टोबरपर्यंत विशेष मोहिम, ५ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे व ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.
१ जानेवारी २०१८ रोजी ज्यांचे वय १८ वर्षांचे आहे अशा व्यक्तींनी नमुना ६, मतदार यादी नाव नोंदणीकरिता नमुना ७, मतदार यादीतील नाव वगळणीसाठी नमुना ८, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्तीसाठी व नमुना ८ अ विधानसभा मतदार संघात पत्ता बदलासाठी तहसील कार्यालयात असलेल्या मतदार मदत केंद्रावर असलेल्या बिएलओकडे आवश्यक दस्ताऐवजा सह भरून द्यावा. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बुथ लेवल एजंट नेमावेत. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रमाचा फलक त्यांचे कार्यालयासमोर लावावा व या कार्यक्रमास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.

Web Title: Bhandara District is the best in the newly registered registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.