अन विमान प्रवासाने भारावली तुमसरची ‘श्रावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:50 AM2018-06-29T00:50:21+5:302018-06-29T00:50:36+5:30

पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यांसारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत विमानतळ पाहून अक्षरक्ष: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया आहे श्रावी शिवशंकर बोरकर या विद्यार्थिनीची.

Airliner travels with the help of 'Shravavi' | अन विमान प्रवासाने भारावली तुमसरची ‘श्रावी’

अन विमान प्रवासाने भारावली तुमसरची ‘श्रावी’

Next
ठळक मुद्देलोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा : दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यांसारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत विमानतळ पाहून अक्षरक्ष: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया आहे श्रावी शिवशंकर बोरकर या विद्यार्थिनीची.
लोकमत समूहातर्फे ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करविण्यात आली. यात सहभागी होऊन परतल्यानंतर श्रावी बोरकर या विद्यार्थिनीने प्रवासाचे वर्णन कथन केले. मंगळवारला परत आल्यानंतर गुरूवारला सकाळी तिचा तुमसर येथील शारदा विद्यालयात लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य राजकुमार बालपांडे, प्रा.राहुल डोंगरे, कार्यालयप्रमुख मोहन धवड, वितरण अधिकारी विजय बन्सोड, तुमसरचे शहर प्रतिनिधी राहुल भुतांगे, तुमसरचे लोकमत वितरक संजीव थोटे व शिक्षकवृंद उपस्थित होते.
नागपूर विभागातील ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेतील विजेते मंगळवारला सकाळी ७ वाजता नागपूरहून दिल्लीला विमान प्रवासाला निघाले. सर्वांचाच पहिला विमान प्रवास असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आम्ही पोहोचलो. त्यानंतर काही वेळातच गोवा व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची एकत्र भेट झाली. येथे दोन्ही राज्यातील विद्यार्थी एकत्र भेटले. त्यानंतर देशाच्या राजधानी भेटीच्या प्रवासाला सुरूवात झाली. महामहिम उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मानव संसाधन विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन पाहण्याची संधी मिळाली.
शालेय जीवनात कोणत्याही उपक्रमातून हवाई सफर घडविण्याची संधी उपलब्ध झाली नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला ‘लोकमत’ समूहाने ही संधी उपलब्ध करून दिली, असे सांगत उपराष्ट्रपती नायडू यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही सर्व अनुभूती आपल्याला स्वप्नवत वाटत होती, अशी प्रतिक्रिया श्रावी बोरकर या विद्यार्थिनीने दिली. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर दीड तासात विमान नागपूरला पोहोचले, असे श्रावीने सांगितले. लोकमत समूहातर्फे श्रावीला मिळालेल्या दिल्ली हवाई सफरीमुळे शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व कुटुंबामध्ये आनंद व्यक्त होत आहे. ‘लोकमत’च्या उपक्रमामुळे श्रावीला विमान प्रवास करण्याची संधी मिळाली, असे भावोद्गार बोरकर कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना काढले.

Web Title: Airliner travels with the help of 'Shravavi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत