६३ प्रकल्पात केवळ २० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:31 PM2019-03-13T22:31:45+5:302019-03-13T22:32:07+5:30

उन्हाळ्याची दाहकता सुरू होताच जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ २०़४१ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात तीन टक्क्यानी वाढ आहे.

63 reservoirs with only 20% water storage | ६३ प्रकल्पात केवळ २० टक्के जलसाठा

६३ प्रकल्पात केवळ २० टक्के जलसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देजलसंकटाचे सावट : वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा, उपायोजनांची नितांत गरज

देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उन्हाळ्याची दाहकता सुरू होताच जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ २०़४१ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात तीन टक्क्यानी वाढ आहे.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २४़२४, बघेडा १४.०९, बेटेकर बोथली आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २१़७८ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा २१.८२ टक्के आहे़ जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी.
पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे.
जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ २४़८४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी १२ मार्च रोजी ६३ प्रकल्पात २१़७७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी १७़८८ एवढी होती. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.
पाण्याचा ठणठणाट
जिल्ह्यातील पाटबंधारे विभागातंर्गत असलेल्या १५ प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, डोंगरला, हिवरा, आमगाव, कनेरी, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा प्रकल्पांचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या सुरुवाती पासून अनेक गावात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

Web Title: 63 reservoirs with only 20% water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.