Vastu Shastra: घरातले आजारपण संपता संपत नाही? वास्तुशास्त्रात सांगितलेले सोपे उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:20 PM2024-03-27T16:20:02+5:302024-03-27T16:20:25+5:30

Vastu Tips: चुकीची आहारपद्धती, चुकीची औषध, चुकीचा उपचार तब्येतीला हानीकारक ठरू शकतो, तसा वास्तु शास्त्रात दिलेला नियम वास्तु दोषास कारणीभूत ठरू शकतो!

Vastu Shastra: Sickness at home never ends? Do the simple solutions mentioned in Vaastu Shastra! | Vastu Shastra: घरातले आजारपण संपता संपत नाही? वास्तुशास्त्रात सांगितलेले सोपे उपाय करा!

Vastu Shastra: घरातले आजारपण संपता संपत नाही? वास्तुशास्त्रात सांगितलेले सोपे उपाय करा!

निरोगी जीवनासाठी आपल्याला पोषक आहाराबरोबरच शुद्ध हवा, सूर्यप्रकाश आणि शारीरिक व्यायामाची गरज असते. पण चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे या सर्व गोष्टी आता आपल्यापासून दूर होत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. यामुळे अगदी कमी वयातले तरुणसुद्धा वेगवेगळे बाम चोळताना, औषधं घेताना आढळतात. ज्येष्ठ मंडळी तर जेवण कमी आणि औषधच जास्त खातात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता औषधं ही आपल्या आयुष्याचा एक भाग झालेली असली, तरी अकारण घरात ती यत्र तत्र सर्वत्र पसरून ठेवू नये. तसे करणे देखील आजाराला आमंत्रण ठरू शकते. याबाबतीत वास्तू शास्त्र काय सांगते ते जाणून घेऊ. 

घरी चुकीच्या दिशेने औषधे ठेवू नका

घर रोगमुक्त ठेवण्यासाठी घरात स्वच्छ सूर्यप्रकाश हवा. तसेच घरातील वस्तू योग्य जागी ठेवलेलया हव्या. अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरातील आजारपणाला कधी कधी वास्तुदोष देखील कारणीभूत ठरतात. जर तुम्ही औषधे चुकीच्या दिशेने ठेवली तर नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि घराचा कोपरा आजारांचे माहेरघर होतो. आज आम्ही तुम्हाला औषधे ठेवण्याशी संबंधित अनेक वास्तु टिप्स सांगणार आहोत. त्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे कुटुंब निरोगी आणि रोगमुक्त करू शकता.

चुकूनही या दिशेला औषधे ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, औषधे चुकूनही आपल्या पलंगावर किंवा उशीखाली ठेवू नयेत. झोपेआधी औषध घेणे सोयीचे जावे म्हणून जरी आपण हा पर्याय निवडत असलो तरी त्याच्या नकारात्मक लहरी आपल्या निद्रावस्थेत मनाचा ताबा घेतात. आपली मनस्थिती बिघडते आणि मनस्थिती बरोबर ग्रहथिती बिघडते. राहू केतू हे आजाराचे आणि अनारोग्याचे कारक असतात. घरातील ही नकारात्मकता राहू केतू ला आमंत्रण देतात आणि आजार तुमचा पिच्छा सोडत नाहीत. 

घराच्या आग्नेय दिशेला ठेवल्याने घरात दीर्घकालीन आजाराचा मुक्काम राहतो आणि आजारपण व औषधोपचारात पैसा पाण्यासारखा वाया जाऊन कुटुंब कंगाल होते. म्हणून आग्नेय दिशेला औषधं ठेवू नका. 

वास्तु तज्ञांच्या मते, औषधे पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवणे टाळावे. असे केल्याने व्यक्ती बरी होण्याऐवजी अधिक आजारी पडते. शिवाय अनेक नकारात्मक गोष्टी आयुष्यात घडू लागतात. केवळ आजारी व्यक्ती नाही तर त्यामुळे पूर्ण कुटुंबाचे मनस्वास्थ्य बिघडते. 

अनेक लोक औषधांसाठी प्रथमोपचार पेटी घरी ठेवतात, तसे करणे चुकीचे नाही. मात्र घरात जेवढी केवढी औषधे आहेत ती एकाच ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून ती आयत्या वेळी सापडतील आणि घरभर औषधांनि नकारात्मकता येणार नाही. 

औषधे या दिशेने ठेवावीत

वास्तुशास्त्रानुसार औषधे गरज असेल तेव्हाच घरात आणावीत. अत्यावश्यक औषधं घरात आणून ठेवलेली असतील तर ती उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेला ईशान्य असेही म्हणतात. या दिशेला औषधे ठेवल्याने माणूस लवकर निरोगी होतो आणि घरातले आजारपण संपते. 

Web Title: Vastu Shastra: Sickness at home never ends? Do the simple solutions mentioned in Vaastu Shastra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.