परळीत 250 कंत्राटी स्वच्छता कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:18 AM2019-07-02T10:18:40+5:302019-07-02T10:20:40+5:30

तीन महिन्यांपासून खाजगी कंपनीने वेतन दिले नाही

Work Stop movement demanded wages of contract workers in Parali | परळीत 250 कंत्राटी स्वच्छता कर्मचारी संपावर

परळीत 250 कंत्राटी स्वच्छता कर्मचारी संपावर

Next

परळी: तीन महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने नगर पालिकेच्या  250 खाजगी सफाई कामगारांनी मंगळवारी सकाळपासून संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला. सध्या शहरातून विविध दिंडी जात असल्याने संपामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण व्होऊ शकतो

 

पुण्याच्या एका खाजगी एजन्सी मार्फत शहरात स्वछतेचे काम चालू आहेत. या कंपनीने कंत्राटी कामगारांना तीन महिन्या पासुन वेतन अदा केले नाही .त्यामुळे 250 कामगारांनी आज पासुन काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. महिला, पुरुष  कामगार मोंढा येथे सकाळी 7 वाजता  जमले आणि जोपर्यंत तीन महिन्याचे वेतन दिल्या जात नाही तो पर्यंत शहरातील  रोडवरील साफसफाई केली जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. 

स्वछता समिती चे सभापती अनिल अष्टेकर ,कार्यालयीन अधीक्षक दिलीप रोडे, स्वछता निरीक्षक श्रावनकुमार घाटे , शंकर साळवे , अशोक दहिवडे यांनी मोंढ्यात  येऊन कामगारांची भेट घेतली. काम बंद आंदोलना मुळे शहरातील स्वछता आज होऊ शकणार नाही.परंतु  नप च्या कामगारांमार्फत काही ठिकाणचे रोड साफ करण्याचे काम चालू होते. सद्या बाहेरगावाहून परळी मार्गे दिंड्या पंढरपूर कडे निघत आहेत, बंदमुळे शहर सफाई न झाल्याने यात्रेकरूंना काही प्रमाणात अस्वच्छतेचा त्रास व्होऊ शकतो.

Web Title: Work Stop movement demanded wages of contract workers in Parali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.