पाटोद्यात पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:05 AM2018-12-11T01:05:03+5:302018-12-11T01:05:17+5:30

भीमनगर आणि परिसरातील त्रासलेल्या महिलांनी नगरपंचायतीवर हंडामोर्चा काढला.

Women's Garbage Morcha for Patola Water | पाटोद्यात पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा

पाटोद्यात पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टँकरने पाणी जलकुंभात टाकले जात असले तरीही दोन महिन्यांपासून काही भागात पाणी मिळत नाही. भीमनगर आणि परिसरातील त्रासलेल्या महिलांनी नगरपंचायतीवर हंडामोर्चा काढला. कार्यालयात जबाबदार अधिकारी, पदाधिकारी गैरहजर असल्याने मोर्चेकरी महिलांनी कार्यालयात गोंधळ घातला.
भीमनगर आणि परिसरात मागील दोन महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर त्रासलेल्या महिलांनी सोमवारी नगर पंचायतीवर हंडामोर्चा काढला. मोर्चाद्वारे पाणी मागणाऱ्या महिलांना नगर पंचायतीत कुणीही जबाबदार पदाधिकारी किंवा मुख्याधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चिडलेल्या महिलांनी एकच गलका करून गोंधळ घालायला सुरु वात केली. काही नगरसेवकांनी मध्यस्थी करीत कक्ष अधिकाºयास निवेदन स्वीकारून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन द्यायला भाग पाडले.
पाण्यासाठी झालेल्या या आंदोलनात आसराबाई अडागळे, अर्चना अडागळे, सिंधू अडागळे, कुसुम गाडेकर, सुनीता गाडेकर, द्वारका जाधव, अनिता थोरात, प्रभा अडागळे, लक्ष्मी जावळे आदींसह मोठ्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Women's Garbage Morcha for Patola Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.