गोदावरी काठावरील गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:32 AM2019-02-14T00:32:13+5:302019-02-14T00:33:24+5:30

तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दरम्यान तालुक्यातील काही गावात टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी बहुतांश गावे, वाडी, वस्तीवरील नागरिक पाणीटंचाईने हैराण आहेत.

Water to the villages on the Godavari stretch | गोदावरी काठावरील गावांना पाणीटंचाईच्या झळा

गोदावरी काठावरील गावांना पाणीटंचाईच्या झळा

googlenewsNext
ठळक मुद्देबोअरवेल, कूपनलिका ठरू शकते पर्याय : तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी; ७५ गावांत १०० टँकरने पाणी

गेवराई : तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दरम्यान तालुक्यातील काही गावात टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी बहुतांश गावे, वाडी, वस्तीवरील नागरिक पाणीटंचाईने हैराण आहेत. या गावात कूपनलिका, बोअरवेल घेतल्यास पाणी टंचाईवर मात होऊ शकते. तरी यासाठी पं.स.मार्फत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बी.एम.प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांना दिला आहे.
अत्यल्प पावसामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागल्याचे विदारक चित्र आहे. यातच ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा गोदावरी नदीच्या परिसरातील गावात देखील पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
दरम्यान, तालुक्यातील जवळपास ७५ गावांत १०० टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र अजूनही बहुतांश गावात तसेच गोदावरी पट्यातील गावात टँकर सुरु नसल्याने पाण्यासाठी वणवण भटकंती आहे.
टँकर सुरू करण्याची मागणी आहे

Web Title: Water to the villages on the Godavari stretch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.