ट्रक-कारची धडक; चार वºहाडी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:11 AM2019-02-25T00:11:58+5:302019-02-25T00:12:29+5:30

ट्रक व कारचा समोरासमोर जोराची झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला.

Truck-car strikes; Four and a bone dead | ट्रक-कारची धडक; चार वºहाडी ठार

ट्रक-कारची धडक; चार वºहाडी ठार

Next
ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील घटना : मयत बीड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील

बीड : ट्रक व कारचा समोरासमोर जोराची झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला. अंबाजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव येथील तरुणाच्या लग्नासाठी हे सर्व कपिलधारला आले होते. मृतात नवरदेवाच्या भावाचाही समावेश आहे. मयत हे बीडसह लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी
आहेत.
अक्षय उर्फ आकाश रामलिंग गाढवे (३० रा. धानोरा, ता. अंबाजोगाई), सौरभ अरुण लोहारे (२२ रा. लातूर), ३) तेजस सुभाष गुजर (३२ रा. अंबाजोगाई), ४) मंगेश मल्लिकार्जुन कुंकुकरी (बार्शी जि. सोलापूर) अशी मयतांची नावे असून शुभम दत्तात्रय उंब्रे (रा. वानेवाडी ता. उस्मानाबाद) हे गंभीर जखमी आहेत. शुभम वगळता उर्वरित सर्व एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. तेजस गुजरच्या भावाचे रविवारी कपिलधार येथे लग्न असल्याने हे सर्व तिकडे गेलेले होते. काही कामानिमित्त हे पाच तरुण बीडला गेले होते. काम आटोपल्यानंतर ते पुन्हा कपीलधारच्या दिशेने जात होते. याचवेळी पाली जवळ मांजरसुंब्याकडून येणाऱ्या ट्रकची (एमएच ०९ सीए ०५९२) आणि कारची (एमएच ०२ एके २१११) समोरासमोर धडक झाली. यामध्ये कार ट्रकखाली आल्याने कारचा अक्षरश: चुराडा झाला. दोघे जण जागीच ठार झाले.
अन्य जखमी दोघांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी शुभमवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, बीड ग्रामीण ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ, महामार्गचे पोउपनि भास्कर नवले, भागवत शेलार, जयसिंग वाघ यांच्यासह कर्मचाºयांनी धाव घेतली. पंचनामा करून वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. तोपर्यंत बघ्यांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
बँडबाजा ऐवजी आक्रोश आणि हुंदके
तेजसचा भाऊ कुंभेश यांचे रविवारी कपिलधार येथे दुपारच्यावेळी लग्न होते. बँडबाजाच्या आवाजात सर्वजण आनंदाने आणि उत्साहाने लग्नकार्यात गुंतले होते. त्याचवेळी अपघातात लग्नघरातील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी वार्ता आली आणि क्षणात सर्व परिसर आक्रोश आणि हुंदक्यांनी भरून गेला.
त्यानंतर कुंभेश यांनी रुग्णालयात धाव घेतली असता भाऊ तेजस, मामेभाऊ अक्षय, मेहुणे सौरभ आणि मंगेश यांचे मृतदेह पाहून त्यांनाही भोवळ आली. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी लगोलग त्यांच्यावर उपचार केले.

Web Title: Truck-car strikes; Four and a bone dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.