बीड जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:49 PM2019-07-04T23:49:57+5:302019-07-04T23:50:35+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला आहे. ज्या ठिकाणी २४ तास कडेकोट सुरक्षा असते त्या इमारतीतच चोरी झाल्यामुळे, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Theft in Beed District Collector's office | बीड जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी

googlenewsNext

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला आहे. ज्या ठिकाणी २४ तास कडेकोट सुरक्षा असते त्या इमारतीतच चोरी झाल्यामुळे, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी करून चोरट्यांनी एकप्रकारे प्रशासनासआव्हान दिल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा संच इमारतीच्या छतावर बसवला आहे. त्याठिकाणी १२० बॅटऱ्या एका खोलीत बसवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी ४ बॅट-या चोरट्यांनी लंपास केल्याचे दुरुस्तीदरम्यान गुरुवारी महाउर्जा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. कंपनीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर, प्रशास खडबडून जागे झाले आहे.
४ बॅटºया चोरी गेल्यामुळे मागील ५ महिन्यापासून हा संच निकामी झाला होता. मात्र, कडेकोट बंदोबस्त असताना देखील चोरी झाल्यामुळे, जिल्हा प्रशासनाचे मुख्य कार्यालय तरी सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सौर ऊर्जेचा वापर करुन वीज निर्मिती व कार्यालयीन कामासाठी त्याचा वापर करण्यात येत होता. ऊर्जा साठवून वीज निर्मीती करण्यासाठी २० कि.व्हॉ. पॉवरच्या १२० बॅट-यांचा संच छतावरील एका खोलीत ठेवला आहे. मात्र, लाखों रुपये खर्च करुन देखील हा सौर ऊर्जा संच बंद अवस्थेत होता. त्यामुळे तो सुरु करण्यासाठी महाऊर्जा या कंपनीशी संपर्क साधला, त्यानंतर हा संच दुरुस्त करण्यासाठी कंपनीचे काही कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांना १२० बॅटºयांपैकी ४ बॅट-या चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधीत कंपनीच्या अधिकाºयांनी आपल्या पत्रावर निवासी उपजिल्हाधिकारी यांना याची माहिती दिली.
या कारणामुळेच लाखो रुपये खर्च करुन बसवलेला हा सौर ऊर्जा संच धुळखात पडला असल्याचे त्यांनी सांगितले. या बॅटºया पुन्हा बसवल्या तर हा संच पुन्हा सुरु होणार आहे. मात्र, बॅटरी चोरी गेल्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना विचारले असता ते म्हणाले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
प्रशासन गाफिल की चोरटे हुशार ?
जिल्हाभरात चोºयांचे व गुन्हेगारीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे.
चोरी, दरोडे अशा मोठ्या गुन्ह्यातील अनेक प्रकरणांचा निकाल आणखी लागलेला नाही.
त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी झाल्यामुळे प्रशासन गाफील आहे का चोरटे शातीर आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
२०१५ साली बसवला होता सौर ऊर्जा संच
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर २०१४-१५ या वर्षात ३५.२० लाख रुपये खर्च करुन हा सौर ऊर्जा संच बसवण्यात आला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बॅटरी चोरी गेल्यामुळे मागील अनेक महिन्यापासून हा संच धुळखात पडून होता, याच्या दुरुस्तीसाठी संपर्क केल्यानंतर हा बॅटरी चोरीचा प्रकार उघड झाला आहे.

Web Title: Theft in Beed District Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.