‘एआरटीओ’त पुन्हा चोरी; बीडमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:26 AM2017-11-27T00:26:33+5:302017-11-27T00:26:41+5:30

बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) पुन्हा एकदा शनिवारी चोरी झाली . सीसी टीव्हीसह संगणक, महत्त्वाचे दस्तऐवज आदी मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. वारंवार चो-या होत असल्याने अन् गैरप्रकारांना कार्यालयात निर्बंध नसल्याने अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे येथील अधिकारी संशयाच्या भोव-यात सापडले आहेत.

Stealth again in 'ARTO'; Bead Sensation | ‘एआरटीओ’त पुन्हा चोरी; बीडमध्ये खळबळ

‘एआरटीओ’त पुन्हा चोरी; बीडमध्ये खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकारी संशयाच्या भोव-यात

बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) पुन्हा एकदा शनिवारी चोरी झाली . सीसी टीव्हीसह संगणक, महत्त्वाचे दस्तऐवज आदी मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. वारंवार चो-या होत असल्याने अन् गैरप्रकारांना कार्यालयात निर्बंध नसल्याने अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे येथील अधिकारी संशयाच्या भोव-यात सापडले आहेत.


नेहमीच वादग्रस्त असणा-या या ‘एआरटीओ’ कार्यालयात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी कार्यालयास दुपारी सुटी होती. सर्व अधिकारी, कर्मचारी घरी गेले. हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री कार्यालयात धुमाकूळ घातला. संगणकाची तोडफोड करीत महत्त्वाचे दस्तऐवज फाडून टाकले. तसेच चोरी करुन बाहेर पडताना या चोरट्यांनी सीसी टीव्ही कॅमेरे फोडले, तसेच ज्या ठिकाणी हा डाटा संकलित होतो, ते यंत्रही तोडले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा चोरीचा उद्देश नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे; परंतु महत्त्वाचे दस्तऐवज फाडून टाकत सीसी टीव्ही फोडल्यामुळे हे काम कुणी तरी जवळच्या व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू आहे. यापूर्वीच्या गुन्ह्यांचाही तपास लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

फिर्याद देण्यास उशीर
घटनास्थळी जाऊन बीड ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. काही पुरावेही हस्तगत केले. या चोरीची फिर्याद देण्यासाठी ‘एआरटीओ’ कार्यालयातील कुणी तरी पुढे येईल, अशी पोलिसांना अपेक्षा होती; परंतु तसे झाले नाही. दुपारनंतर वरिष्ठ लिपिक ताहेर मोहंमद खलील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्याद देण्यास उशीर केल्याने संशय व्यक्त होत आहे.

कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर
येथील आरटीओ कार्यालयात ‘निकम्मे’ अधिकारी असल्यामुळे सर्व कारभार दलालच पाहतात. कार्यालयात येऊन महत्त्वाचे दस्तऐवज हाताळण्याची त्यांना भीती वाटत नाही. हा सर्व प्रकार अधिकाºयांच्या अर्थपूर्ण सहकार्याने होत असल्याचा आरोप केला जात आहे. रविवारी झालेल्या चोरीने याला पुष्टी दुजोरा मिळाला.

Web Title: Stealth again in 'ARTO'; Bead Sensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.