जिव्हाळ्याच्या मित्र-मैत्रीणीना सोशल मिडीयाने आणले २५ वर्षानंतर एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 06:34 PM2017-08-22T18:34:40+5:302017-08-22T18:35:04+5:30

सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर हा अनेक अर्थाने फायद्याचा ठरतो. याचीच प्रचीती शहरातील सिध्देश्वर विद्यालयात रविवारी आली. कारण होते, शाळेच्या सन १९९१ च्या १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे. तब्बल २५ वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या चेह-यावर यावेळी आंनद ओसंडून वाहत होता.

Social media gathering together after 25 years of intimate friendship | जिव्हाळ्याच्या मित्र-मैत्रीणीना सोशल मिडीयाने आणले २५ वर्षानंतर एकत्र

जिव्हाळ्याच्या मित्र-मैत्रीणीना सोशल मिडीयाने आणले २५ वर्षानंतर एकत्र

googlenewsNext

माजलगाव (बीड), दि. २२ : सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर हा अनेक अर्थाने फायद्याचा ठरतो. याचीच प्रचीती शहरातील सिध्देश्वर विद्यालयात रविवारी आली. कारण होते, शाळेच्या सन १९९१ च्या १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे. तब्बल २५ वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या चेह-यावर यावेळी आंनद ओसंडून वाहत होता. याचवेळी उपस्थित शिक्षकांचा देश-विदेशात पोहचलेल्या आपल्या विद्यार्थ्यांची घौडदौड ऐकून अभिमानाने मान ताठ झाली होती. 

१९९१ ला दहावी पास झाल्यानंतर सिध्देश्वर विद्यालयातुन बाहेर पडलेली विद्यार्थी पुढे आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाली. बघता बघता २५ वर्ष उलटली. यातच कांही वर्गमित्रांनी प्रयत्न करुन शाळेतील त्या वेळचे हजेरीपुस्तक मिळवून त्याच्या आधारे काही जणांचे मोबाईल क्रमांक मिळवले. याच्या आधारे 'जिव्हाळा' नावाचा सोशल मिडीयावर ग्रुप तयार झाला. यावर एकमेकांची खयाली खुशाली कळल्यानंतर सर्वांनी प्रत्यक्ष भेटण्यासाठी 'गेट टुगेदर' घेण्याची संकल्पना पुढे आली. सर्वांनी २० ऑगस्ट या तारखेवर होकार कळवला आणि सर्वानांचा प्रत्यक्ष भेटीचे वेध लागले. 

जर्मनी, चेन्नई, पुणे, मुंबई, कोल्हापुर, औरंगाबाद आदी ठिकाणावरुन मित्रकंपनी आदल्या दिवशीच शहरात दाखल झाली. रविवारच्या कार्यक्रमास तत्कालीन कडकशिस्तीचे मुख्याध्यापक वसंतराव देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, मुलांवर खरे संस्कार घरातून होतात नंतर शाळेतून व समाजातून होतात असे म्हटले. तसेच शिक्षण घेऊन विद्यार्थी चांगला नागरीक व्हावा ही प्रत्येक शिक्षकाची अपेक्षा असते. आपण सर्वच एका चांगल्या समाजाचे पायिक ठरत आपआपल्या भूमिका पार पाडत आहात याचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या मुलांची इतरांशी तुलना करु नका असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मंजुळादास गवते यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

शिक्षक व कर्मचा-यांचा केला सत्कार 
या विद्याथ्र्यांना इयत्ता १ ली पासुन ते १० वी पर्यंत शिकविणा-या एल.आर. देशपांडे, भगवानराव चौधरी, नारायणराव ठोंगे, आत्माराम सुतळे, गणपतराव ईके, उध्दव नागरगोजे, रत्नमाला देशपांडे, उध्दव शिंदे, अनंताचार्य काशिकर, एन.एम.शिंदे, शिवलाल निचळे, वि.र. कुलकर्णी, अरुण वेळापुरे, प्रा. जनार्धन पटवारी, शंकरलाल ओस्तवाल, संतोष देशमुख, श्रीरंग राठोड, प्रा. लक्ष्मण मस्के, फकीरा देडे, बळीराम सोळंके, बबन कानडे, लक्ष्मण बनसोडे, गोविंद तिडके, कांता हुडवेकर, विमल झरकर, विठल सोनवणे, विलास बोबडे, विठल जोशी, ग्यानबा म्हाळंगे, र.क. गायकवाड सह शिपाई अर्जुनमामा आणि मथुरामावशी आदींचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सावित्री घाटुळ तर सूत्रसंचालन बाळासाहेब झोडगे यांनी केले. आभार राजाभाऊ आवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शैलेश पाठक, नारायण टकले, डॉ. राजेश रुद्रवार, नितीन मुंदडा, सतिश शिंदे, जगदीश पोपळे, डॉ. अजय डाके, बालाजी तिडके, सतिष सोळंके, बळीराम चव्हाण, विनोद जाधव, सुनिल खामकर, संदीप शिनगारे, रामानंद भंडारी, शाम जोशी, डॉ. सदाशिव सरवदे, भारत होके, मधुकर आवारे, डॉ. अशोक तिडके, पुरुषोत्तम करवा, सुदाम बादाडे, वसंत मसलेकर, रामेश्वर करवा आदींनी प्रयत्न केले. 

Web Title: Social media gathering together after 25 years of intimate friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.