शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची पालवेंना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:20 AM2019-01-11T00:20:44+5:302019-01-11T00:22:02+5:30

तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील ८ दिवसांपासून दीड ते तीन वर्षाखालील ५ ते ६ जनावरे, शेळ््यांचे २७ कोकरे आणि २ शेळ्या दगावले आहेत. यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसंग्रामचे नवनाथ प्रभाळे व काही कार्यकर्ते पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष पालवे यांच्याकडे आले होते.

Shiv Sangram Sangh activists shocked Pavwena | शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची पालवेंना धक्काबुक्की

शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची पालवेंना धक्काबुक्की

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील प्रकार : अंथरवन पिंपरी येथे जनावरे दगावल्याच्या प्रकरणावरून गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील ८ दिवसांपासून दीड ते तीन वर्षाखालील ५ ते ६ जनावरे, शेळ््यांचे २७ कोकरे आणि २ शेळ्या दगावले आहेत. यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसंग्रामचे नवनाथ प्रभाळे व काही कार्यकर्ते पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष पालवे यांच्याकडे आले होते. यावेळी प्रभाळेंसह काही कार्यकर्त्यांनी डॉ.पालवे यांना धक्काबुक्की केली. हा सर्व प्रकार उपाध्यक्ष जयश्री मस्के यांच्या कार्यालयात झाल्यामुळे, दोन व्यक्तींच्या राजकीय द्वेषाचा डॉ.पालवे यांना फटका बसला अशी चर्चा जिल्हा परिषद कार्यालयात रंगली होती.
म्हाळस जवळा येथील पशुसंवर्धन दवाखान्याच्या अंतर्गत अंथरवन पिंपरी हे गाव आहे. त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांशी गावातील शेतकऱ्यांनी संपर्क साधला होता. मात्र योग्य उपचार व लसीकरण मिळाले नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. त्यानंतर येथील शिवसंग्रामचे कार्यकर्ते नवनाथ प्रभाळे यांनी या विषयासंदर्भात पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष पालवे यांची भेट घेण्यासाठी जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष मस्के यांच्या कार्यालयात गेले. यावेळी डॉ.पालवे यांनी आपण चर्चा करावी, असे सांगीतले. मात्र प्रभाळे व त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी तुम्ही अंथरवन पिंपरीला चला, असे म्हणत धक्का बुक्की केली. त्यानंतर जिल्हा परिषद सीईओ कार्यालयाजवळ धाप लागल्यामुळे डॉ.पालवे खाली बसले.
यावेळी जि.प.मधील इतर अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला नाही. त्यानंतर सीईओंनी या घटनेची गंभीर दखल घेत अंथरवन पिंपरी येथील परिस्थितीचा अहवाल तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.
अंथरवन पिंपरी येथील जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले असून आठ डॉक्टरांचे पथक गावात ठाण मांडून आहे.
पालवेंना राजकीय द्वेषाचा फटका
४शिवसंग्रामला सोडचिठ्ठी दिलेले राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जयश्री मस्के ह्या जि.प.उपाध्यक्ष तसेच पशुसंर्धन विभागाच्या सभापती आहेत.
४ज्या वेळी हा प्रकार घडला, त्यावेळी डॉ.संतोष पालवे कार्यालयीन कामासाठी जि.प.मधील उपाध्यक्षांच्या कार्यालयात आले होते.
४त्याच ठिकाणी शिवसंग्रामचे प्रभाळे व इतर काही कार्यकर्ते डॉ.पालवे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले व हा प्रकार घडला.
४यावेळी उपाध्यक्षांच्या कार्यालयातील खुर्च्या देखील फेकण्यात आल्या व डॉ.पालवे यांना धक्का बुक्की करण्यात केली.
४त्यामुळे दोघांच्या द्वेषाचे डॉ.पालवे यांना फटका बसला, अशी चर्चा जिल्हा परिषद कार्यालयात रंगली होती.

Web Title: Shiv Sangram Sangh activists shocked Pavwena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.