माजलगावात शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापार्‍यांच्या धान्याची खरेदी; संस्थेचा मनमानी कारभार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 04:38 PM2018-11-17T16:38:25+5:302018-11-17T16:50:48+5:30

व्यापारी व राजकिय पुढार्‍यांनी तालुक्याच्या बाहेरून खरेदी करून आणलेल्या धान्याची एक हजार क्विंटलवर मापे करण्यात आली.

Purchase of merchandise instead of farmers at Government Shopping Center at Majalgaon; Arbitrariness of the institution | माजलगावात शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापार्‍यांच्या धान्याची खरेदी; संस्थेचा मनमानी कारभार 

माजलगावात शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापार्‍यांच्या धान्याची खरेदी; संस्थेचा मनमानी कारभार 

Next
ठळक मुद्दे दोन दिवसापासून शासकिय खरेदी केंद्र सुरूसंतप्त शेतकर्‍यांनी पाडले खरेदी केंद्र बंद

माजलगाव (बीड ) : शासकिय खरेदी केंद्रावर व्यापार्‍याची चलती असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. माजलगाव येथील शासकिय खरेदी केंद्र हे अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शितल कृषी निरीष्ठा सहकारी संस्थेस मिळाले असून त्यांनी दोन दिवसापूर्वी खरेदी केंद्र सुरू केले. मात्र या खरेदी केंद्रावर शेतकरी सोडून चक्क व्यापारी व राजकिय पुढार्‍यांनी तालुक्याच्या बाहेरून खरेदी करून आणलेल्या धान्याची एक हजार क्विंटलवर मापे करण्यात आली.

शासनाने शेतकर्‍यांच्या धान्याला योग्य भाव मिळावा, या करिता शासकिय खरेदी केंद्र सुरू केले आहेत. माजलगाव येथील हे शासकिय खरेदी केंद्र अंबाजोगाई येथील शितल कृषी निरीष्ठा सहकारी संस्थेस दिले आहे. शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी माजलगाव तालुका खरेदी विक्री संघाकडे केली. परंतू शासकिय खरेदी मिळालेल्या केंद्राने या नोंदीप्रमाणे शेतकर्‍यांना एस.एम.एस. न पाठवता. दोन दिवसापूर्वीच माजलगाव बाजार समितीच्या फुलेपिंपळगाव येथील मार्केट यार्डातील आडत लाईनला आडोश्याला हे खरेदी केंद्र सुरू केले. या खरेदी केंद्रावर दोन दिवसात  राजकिय नेते व व्यापारी यांच्याशी संगणमत करून त्यांनी खरेदी केलेल्या मुगाची मापे उरकून शेतकर्‍यांना मात्र वंचित ठेवले आहे.

या दोन दिवसात जवळपास 1 ते 1.5 हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली आहे. यांची माहिती शेतकर्‍यांना कळताच शुक्रवारी सकाळी 11 वा. दरम्याण चालू असलेल्या खरेदी केंद्रावर जावून आमची नोंदणी अगोदर असतांना आम्हाला एस.एम.एस. का सोडले नाही असा जवाब विचारला. खरेदी केंद्रावर खरेदी झालेले धान्य कोणाचे ? त्यांची कागदपत्रे कुठे ? ज्यांच्या मालाची खरेदी केली ते शेतकरी कोठेत ? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली. यावर खरेदी केंद्रावरील कर्मचार्‍यांनी निरूत्तर झाल्याने शेतकरी अधिकच आक्रमक होवून खरेदी केंद्र बंद केले.दरम्यान  खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याची माहिती कळताच शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र होके पाटील, अ‍ॅड.दत्ता रांजवण यांनी भेट देवून अधिकार्‍यांची कानउघडणी केली.

शिवसेनेने दिले तहसिलदारांना निवेदन
माजलगाव येथील शासकिय धान्य खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची अडवणूक करून व्यापारी व राजकिय पुढार्‍यांनी परजिल्ह्यातून खरेदी केलेल्या मालाची मापे होत आहेत. हा धान्य खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभार थांबवून संबधितावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह शेतकर्‍यांनी तहसिलदार एन.जी.झंपलवाड यांच्याकडे केली.

खरेदी केंद्रावर अनागोंदी असेल तर कारवाई 
माजलगाव येथील शासकिय धान्य खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या मालाचा तपशिल मागविण्यात येईल. यामध्ये कांही अनागोंदी व अनियमितता आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असे जिल्हा मार्केटींग अधिकारी गोपाळकृष्ठ परदेशी यांनी सांगितले.

आमची नोंदणी एस.एम.एस.का नाही ? 
माजलगाव येथील शासकिय खरेदी केंद्र चालवणार्‍यांनी आमच्या पहिल्या दहा लोकांमध्ये नोंदणी असतांना, दोन दिवसापासून खरेदी केंद्र सुरू असतांना एस.एम.एस.पाठवण्यात आले नाही. हा एक प्रकारे आम्हा शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याचे शेतकरी विक्रम सोळंके, शंकर सोळंके यांनी सांगितले.

राजकिय पुढारी व व्यापार्‍यांचा क्विंटलमागे दोन हजाराचा फायदा 
शासकिय खरेदी केंद्रावर शेतकरी सोडून व्यापारी व राजकिय पुढार्‍यांची मुगाची खरेदी करण्यात  आलेल्या थप्या शासकिय पोत्यात शिल करून ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान तालुक्यातील राजकिय पुढारी व व्यापार्‍यांनी  खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याचा फायदा उचलला. दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍यांकडून चार ते साडेचार हजार रूपये प्रति क्विंटल भावाने मुगाची खरेदी केली. तोच मुग आता शासकिय खरेदी केंद्रावर स्वतःची मक्तेदारी चालवून घालण्याचे काम होत आहे. शासकिय आधारभूत मुगाला 6 हजार 975 रूपये आहे. त्यामुळे क्विंटलमागे जवळपास दोन ते अडिच हजार रूपये व्यापारी व राजकिय पुढार्‍यांना होत असतांना दिसून येत आहे.

Web Title: Purchase of merchandise instead of farmers at Government Shopping Center at Majalgaon; Arbitrariness of the institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.