सासरच्या छळास कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:16 AM2019-01-16T00:16:05+5:302019-01-16T00:16:55+5:30

पहिली मुलगी असल्याने दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या विवाहितेची सोनोग्राफी करून लिंगचाचणी करण्यासाठी दहा हजार रुपये आणि व्यवसायासाठी एक लाख रुपये माहेराहून घेऊन येण्याच्या मागणीसाठी तिचा सतत छळ करण्यात आला. या छळास कंटाळून त्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परळी शहरात शिवाजीनगर भागात सोमवारी उघडकीस आली.

Pregnant woman committed suicide due to husband-wife persecution | सासरच्या छळास कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या

सासरच्या छळास कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या

Next
ठळक मुद्देपरळीतील घटना : पतीसह पाच जणांवर गुन्हा; सोनोग्राफीसाठी दहा हजारांची केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : पहिली मुलगी असल्याने दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या विवाहितेची सोनोग्राफी करून लिंगचाचणी करण्यासाठी दहा हजार रुपये आणि व्यवसायासाठी एक लाख रुपये माहेराहून घेऊन येण्याच्या मागणीसाठी तिचा सतत छळ करण्यात आला. या छळास कंटाळून त्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परळी शहरात शिवाजीनगर भागात सोमवारी उघडकीस आली.
मनीषा सुदर्शन घुगे (वय ३४, रा. शिवाजीनगर, परळी) असे त्या विवाहितेचे नाव आहे. मनिषाचे लग्न २०१२ साली सुदर्शन केशव घुगे याच्यासोबत झाले होते. त्यांना तीन वर्षाची एक मुलगी देखील आहे.
लग्नानंतर काही दिवसातच सासरा केशव घुगे, सासू कुसुमबाई, पती सुदर्शन, दिर सदाशिव आणि जाऊ सुरेखा यांनी वेल्डिंगचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये, म्हणून छळ सुरु केला. तिला सतत उपाशी ठेऊन मारहाण करण्यात येऊ लागली. त्यातच पाच महिन्यापूर्वी मनीषा गर्भवती राहिली. परंतु, पहिली मुलगी आहे, आता दुसरी देखील मुलगीच आहे का, हे तपासण्यासाठी सोनोग्राफी करायची असून त्यासाठी माहेरहून १० हजार रुपये घेऊन ये, अशी मागणी करत मनीषाचा पुन्हा छळ सुरु झाला. पैसे घेऊन ये नाहीतर घराबाहेर जा म्हणून सासरचे लोक खूप मारहाण करत असल्याचे मनीषाने रविवारी दुपारी माहेरी फोन करून सांगतिले होते.
यावेळी संक्रांत झाल्यावर पैश्याची सोय करू असा दिलासा तिला माहेरकडून देण्यात आला. मात्र, सोमवारी दुपारी ४ वाजता मनीषा दरवाजा उघडत नसल्याचे पतीने तिचे भाऊ हरिदास केशव मुंडे यांना फोनवरून कळविले. हरिदास यांनी चुलत भावासह मनीषाच्या घरी धाव घेऊन दरवाजा उघडून पहिले असता मनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली असे हरिदास मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी मुंडे यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींवर संभाजीनगर पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pregnant woman committed suicide due to husband-wife persecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.