प्रीतम मुंडे जवळपास १७ कोटींच्या तर बजरंग सोनवणे १२ कोटींचे मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:16 AM2019-03-27T00:16:30+5:302019-03-27T00:17:16+5:30

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे आणि त्यांचे पती गौरव खाडे यांच्याकडे जवळपास १६ कोटी ६४ लाख ७७ हजार रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर राष्टÑवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या पत्नी सारिका, मुलगी हर्षदा, मुलगा सौरव आणि गौरव यांच्याकडे मिळून एकूण १२ कोटी १६ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

Pratima Munde has around 17 crores and Bajrang Sonawane owns 12 crores | प्रीतम मुंडे जवळपास १७ कोटींच्या तर बजरंग सोनवणे १२ कोटींचे मालक

प्रीतम मुंडे जवळपास १७ कोटींच्या तर बजरंग सोनवणे १२ कोटींचे मालक

googlenewsNext
ठळक मुद्देमुंडे यांच्यावर जवळपास १० कोटींचे तर बजरंग सोनवणे यांच्यावर ७९ लाखांचे कर्ज

सतीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे आणि त्यांचे पती गौरव खाडे यांच्याकडे जवळपास १६ कोटी ६४ लाख ७७ हजार रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर राष्टÑवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या पत्नी सारिका, मुलगी हर्षदा, मुलगा सौरव आणि गौरव यांच्याकडे मिळून एकूण १२ कोटी १६ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रामध्ये ही माहिती देण्यात आली. प्रीतम यांच्याकडे १० कोटी ४७ लाख ७० हजार ९४९ रुपयांची तर त्यांचे पती गौरव राजेंद्र खाडे यांच्याकडे २ कोटी २१ लाख २ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. प्रीतम यांच्याकडे ३ कोटी ८७ लाख ४८ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. गौरव खाडे यांच्या नावावर १८ लाख ५६ हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. प्रीतम यांना ८ कोटी ६२ लाख ७७ हजार रुपयांचे तर गौरव खाडे यांना १ कोटी २५ लाख ५६ हजार रुपयांचे देणे आहे. प्रीतम मुंडे या वैद्यकीय शिक्षण एमडी पर्यंत झालेले आहे.
राष्टÑवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या नावावर २ कोटी ५२ लाख ११ हजार तर त्यांच्या पत्नी सारिका यांच्या नावावर १ कोटी १२ लाख ३६ हजार इतकी जंगम मालमत्ता आहे. त्यांची मुलगी हर्षदा यांच्या नावावर १ लाख ८६ हजार, मुलगा सौरव यांच्या नावावर १ कोटी ९० लाख ८० हजार तर गौरव यांच्यानावर १ कोटी ६५ लाख ७ हजार इतकी जंगम मालमत्ता आहे. सोनवणे यांच्या नावावर ८६ लाख ३३ हजार तर सारिका यांच्या नावावर ४० लाख २७ हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. मुलगा सौरव यांच्या नावावर ४३ लाख ५ हजार तर गौरव याच्या नावावर ६१ लाख ८० हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. बजरंग सोनवणे यांना ६४ लाख २३ हजार तर त्यांच्या पत्नी सारिका यांना १४ लाख ३९ हजारांचे देणे आहे. सोनवणे यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे.

Web Title: Pratima Munde has around 17 crores and Bajrang Sonawane owns 12 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.