ठळक मुद्दे ग्रामपंचायत (चिचखंडी ता.अंबाजोगाई) येथे  ७ आॅक्टोबर १७ रोजी निवडणूक झाली. उमेदवारी अर्जासोबत शौचालय असल्याबाबत प्रमाणपत्र व शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव या अटींची पूर्तता आवश्यक होती.

अंबाजोगाई (बीड) : सरपंचपदाच्या निवडणुकीत घरात शौचालय असल्याचे व ते वापरात असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखल केलेल्या सरपंचाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयात संगीता नवनाथ होके यांच्याविरुद्द सविता भाऊराव होके यांनी याचिका दाखल केली आहे. 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१७ अंतर्गत ग्रामपंचायत (चिचखंडी ता.अंबाजोगाई) येथे  ७ आॅक्टोबर १७ रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. उमेदवारी अर्जासोबत शौचालय असल्याबाबत प्रमाणपत्र व शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव या अटींची पूर्तता आवश्यक होती. यासाठी किसन नाथा होके यांच्या घर क्र. १५ चे सदरील कागदपत्र हस्तगत करण्यासाठी सरपंचपदी निवडून आलेल्या संगीता नवनाथ होके यांनी गैरमार्गाचा अवलंब केल्यानंतर रमाई घरकुल योजना लाभार्थी अभिमान श्रीपती होके यांच्या घर क्र. १४ मध्ये किरायाने राहत असल्याच्या खोट्या व बनावट कागदपत्रांचा गैरवापर केला. याचा सक्षम प्रशासकीय यंत्रणेद्वारे तपास केला असता घर क्र. १४ मध्येही शौचालय नसल्याचे स्पष्ट झाले. या गावात ग्रामपंचायतचे सार्वजनिक शौचालयही नाही. 

या प्रकरणी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या २७ सप्टेंबरच्या आदेशान्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा १९५८ अंतर्गत १४ (१) (जे-५) कलमान्वये ७ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयात संगीता नवनाथ होके यांच्याविरुद्द सविता भाऊराव होके यांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात सक्षम प्रशासकीय यंत्रणेद्वारे तपासात शौचालय नसल्याचे निष्पन्न झाल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिका-यांकडे दाखल याचिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिका-यांकडे दाद
उमेदवारीसोबत शौचालय असल्याबाबत प्रमाणपत्र व शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव या अटींची पूर्तता आवश्यक होती. यासाठी सरपंचपदी निवडून आलेल्या संगीता होके यांनी गैरमार्गाचा अवलंब करुन अभिमान होके यांच्या घरात रहात असल्याच्या खोट्या व बनावट कागदपत्रांचा गैरवापर केला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.