पंकजा मुंडेंचा सेवा संकल्प, १२ डिसेंबर रोजी जन्मणाऱ्या बालकांच्या मातांचा सन्मान; रक्तदान, श्रमदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 07:15 PM2023-12-10T19:15:34+5:302023-12-10T19:15:51+5:30

लोकनेते गोपीनाथ मुंडे  यांची जयंती येत्या १२ डिसेंबरला विविध सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरी होणार आहे.

Pankaja Munde's Seva Sankalp, honoring mothers of children born on December 12; Donation of blood, donation of labour | पंकजा मुंडेंचा सेवा संकल्प, १२ डिसेंबर रोजी जन्मणाऱ्या बालकांच्या मातांचा सन्मान; रक्तदान, श्रमदान

पंकजा मुंडेंचा सेवा संकल्प, १२ डिसेंबर रोजी जन्मणाऱ्या बालकांच्या मातांचा सन्मान; रक्तदान, श्रमदान

परळी- लोकनेते गोपीनाथ मुंडे  यांची जयंती येत्या १२ डिसेंबरला विविध सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरी होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे स्वतः या सर्व उपक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने १२ डिसेंबर रोजी जन्मणाऱ्या बालकांच्या मातांचा सन्मान तसेच रक्तदान, श्रमदान व अन्नदानही यादिवशी त्या करणार आहेत. 

यासंदर्भात  पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ संदेश त्यांच्या सोशल मीडियावर जारी  केला आहे. त्या म्हणाल्या, यादिवशी मी काय करणार आहे? याच्या बद्दल तुमच्या मनामध्ये खुप उत्सुकता असेल, मी आणि तुम्ही मिळुन जर कार्यक्रम केला तर त्याच्यामध्ये सुसूत्रता येते. मी आपल्या सर्वांना माझा दिनक्रम सांगेल त्याप्रमाणे जर आपण आपला दिनक्रम त्या दिवशी जोडला तर आपल्या कार्यक्रमामध्ये साम्य नकीच बघायला मिळेल. त्यादिवशी सकाळी उठल्यानंतर मी सर्वप्रथम प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करणार आहे. मुंडे साहेबांच्या विचारांच्या शतायुषी होण्यासाठी  हे माझा प्रयत्न असेल. मुंडे साहेब शतायुषी व्हावे, आपले वडील दीर्घायुषी व्हावे असं प्रत्येक मुलीला वाटतं, आपला नेता मोठा व्हावा असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं, मुंडे साहेबांच्या बाबतीत तसं घडलं नाही, का तर मुंडे साहेबांचे विचार  हे तर शतायुषी किमान व्हावे त्याही पेक्षा मोठे व्हावे  त्यासाठी मी ईश्वरला प्रार्थना करणार आहे.

मुंडे साहेबांची जी विचारधारा होती त्याप्रमाणे प्रार्थना केवळ वैद्यनाथाला करुन भागणार नाही तर मी मस्जिदीत देखील जाणार आहे आणि तद्नंतर मी बौध्द विहारात देखील जाणार आहे. मुंडे साहेब हे सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या लोकांना हवहवंसं वाटणारं असं नेतृत्व होतं, त्यामुळे मुंडे साहेबांची प्रार्थना देखील  सर्व धर्मांच्या, सर्व विचारांच्या लोकांच्या पध्दतीने झाली पाहिजे असा माझा आग्रह आहे. त्यामुळे मी अशी प्रार्थना त्यादिवशी करणार आहे.त्यानंतर गोपीनाथगडावर जावुन मी मुंडे साहेबांचे दर्शन घेणार आहे. आणि मुंडे साहेबांना जेवढे पदार्थ आवडत होते त्या पदार्थाचं ताट तयार करुन तो नैवेद्य मी समाधीच्या तिथे दाखवून मुंडे साहेबांचा वाढदिवस  साजरा करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

त्यानंतर सर्वात श्रेष्ठ असं कुठलं दान असेल तर ते रक्तदान आहे, एखाद्या व्यक्तीला  त्याला हवं असणार्‍या  गरजू रूग्णाला त्याच्या गटाचं रक्त नाही मिळालं तर फार मोठी अडचण निर्माण होते, ही अडचण ओळखुन आम्ही रक्तदानाचे शिबीर त्यादिवशी ठेवलं आहे. मी स्वतः यामध्ये रक्तदान करणार आहे. त्याचबरोबर अन्नदान आणि श्रमदान देखील करणार आहे. रक्तदान झाल्यानंतर गोपीनाथगडावर  मी सकाळी ९ वा. ते दुपारी २ वा.पर्यंत थांबणार आहे, तिथे जे लोकं दर्शनासाठी येतील त्यांच्याशी गाठीभेटी करणार आहे त्यानंतर  परळीमध्ये जेवढे मुलं किंवा मुली जन्मणार आहेत त्यांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या मातांचा  आणि त्यांचा सन्मान त्यादिवशी मी करणार आहे.

कार्यकर्त्यांना आवाहन 
मी तुम्हांला विनंती करते की, मुंडे साहेबांना समर्पित दिवस साजरा करताना  अन्नदान, श्रमदान किंवा रक्तदान यापैकी कुठलं तरी दान आपण जरुर मुंडे साहेबांच्या नावाने करा, या सर्व उपक्रमांचा आपला व्हिडीओ, माहिती, बातम्या, फोटो  हे सर्व आपण माझ्या सोशल मिडीयाच्या  माध्यमातून माझ्याशी  हॅशटॅग गोपीनाथगड असं वापरुन शेअर करा ज्याच्यामुळे आपले सगळे  कार्यक्रम माझ्यापर्यंत पोहोंचतील आणि माझे सुध्दा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोंचतील असं पंकजाताईंनी म्हटलं आहे.

Web Title: Pankaja Munde's Seva Sankalp, honoring mothers of children born on December 12; Donation of blood, donation of labour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.