आता प्रत्येक शासकीय इमारतींच्या आवारात होणार ‘रेन वॉटर हार्वेेस्टिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:31 AM2019-07-06T00:31:10+5:302019-07-06T00:32:56+5:30

यापुढे प्रत्येक शासकीय इमारत बांधताना त्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा शुक्रवारी आदेश काढला आहे.

Now every government building will be in the premises of 'Rain Water Harvesting' | आता प्रत्येक शासकीय इमारतींच्या आवारात होणार ‘रेन वॉटर हार्वेेस्टिंग’

आता प्रत्येक शासकीय इमारतींच्या आवारात होणार ‘रेन वॉटर हार्वेेस्टिंग’

Next
ठळक मुद्देबीडमध्ये हरित इमारत संकल्पना : पावसाच्या साठविलेल्या पाण्याचा होणार पुनर्वापर

बीड :यापुढे प्रत्येक शासकीय इमारत बांधताना त्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा शुक्रवारी आदेश काढला आहे. हरित इमारत संकल्पनेच्या धरतीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्व इमारतींच्या परिसरात पावसाचे पाणी साठवून त्याचा पूनर्वापर होणार आहे. पहिल्यांदाच असे होणार असल्याने पाणी बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे.
वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण, नष्ट होणारी जंगले, वाढते प्रदुषण या सर्वांचाच परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे. उपलब्ध होणारे पावसाचे पाणी काळजीपूर्वक वापरणे, वाहून जाणारे पाणी अडवून शक्य तितका पुनर्वावापर करणे यासारख्या विविध मार्गाने पाणी बचत व संवर्धन करता येते. आता यापुढे सा.बां. विभागामार्फत नवीन इमारतींचे प्रस्ताव तयार करताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची तरतुद करण्यात येणार आहे.
पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जमिनीखाली टाकी बांधून आवश्यकतेप्रमाणे त्यावर ट्रिटमेंट करावी लागणार आहे. हे पाणी पिण्यासाठी न वापरता इतर उपायोगात आणले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची तीव्रता कमी होऊन पाण्याची बचत होईल, अशी आशा आहे.
पाणी संवर्धन : जुन्या इमारतीतही उपक्रम
४जुन्या शासकीय इमारतींची देखभाल, दुरूस्तीही बांधकाम विभागामार्फत केली जाते. हे करताना आता बांधकाम विभाग या इमारतींच्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार आहे. हा उपक्रमाची सर्वत्र अंमलबजावणी झाल्यास पाणी संवर्धनाचा फायदा होणार आहे.

Web Title: Now every government building will be in the premises of 'Rain Water Harvesting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.