वाढीव जनावरे दाखवणाऱ्या बीड जिल्ह्यातील छावण्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:52 PM2019-05-14T23:52:16+5:302019-05-14T23:52:56+5:30

जिल्ह्यातील चारा छावण्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. काही चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची तफावत आढळून आली होती.

Notice to the camps in Beed district showing the wild animals | वाढीव जनावरे दाखवणाऱ्या बीड जिल्ह्यातील छावण्यांना नोटीस

वाढीव जनावरे दाखवणाऱ्या बीड जिल्ह्यातील छावण्यांना नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्दे१८ चारा छावण्यांचा समावेश : दंडात्मक कारवाईसह फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता; देयके रखडणार

प्रभात बुडूख।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील चारा छावण्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. काही चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची तफावत आढळून आली होती. त्यानंतर कारवाई होण्याच्या भितीने पुढील दोन दिवसात बहुतांश चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या घटल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून १२ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले व कारवाई करत खाबूगिरी करणाºया १८ चारा छावण्यांना प्रशासनाने नोटीस दिली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार असून गुन्हे दाखल होणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.
चारा छावण्यांतून शासनाला दररोज अंदाजे १२ लाखांचा चूना या मथळ््याखाली १२ मे रोजी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. ९ मे रोजी प्रशासनाकडून अचानक चारा छावण्याची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर ७४४ जनावरे जास्त दाखवण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे छावणी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली होती. तसेच दोन तलाठी देखील निलंबित करण्यात आले होते.
या प्रकरणानंतर कारवाई होण्याच्या भितीने १० मे रोजी दिलेल्या दैनंदिन अहवालामध्ये जिल्ह्यातील चारा छावण्यावरील जनावरांची संख्या १७ हजार ९१ एवढी घटली होती. म्हणजे कारवाई करण्यापुर्वी ही जनावरे अधिक दाखवून मलिदा खाण्याचा प्रयत्न काही छावणी चालकांकडून करण्यात येत होता. तसेच ज्या गावांमध्ये कारवाईची नोटीस देण्यात आली आहे, त्या ठिकाणी गैरप्रकार करणा-या संस्था त्याच-त्याच दिसून येत आहेत. त्यांना राजकीय पाठबळाची चर्चा आहे.
प्रशासनाने उधळला छावणी टोळीचा डाव
जिल्हा प्रशासनाच्या वतीने चारा छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आल्यामुळे जास्तीची जनावरे दाखवून भ्रष्टाचार करणाºया छावणी टोळीचा डाव प्रशासनाने उधळून लावला आहे.
या चारा छावण्या राजकीय पक्षांशी संबंधीत असलेल्या नेत्याच्या असल्यामुळे कारवाई होऊ नये यासाठी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांकडून दबाव आणला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
काही संस्थांचा सेवाभाव संपला, गुन्हे दाखल करा
सेवाभाव वृत्तीमधून छावणी चालवणाºयांतर्फे देखील अनेक चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यांचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
मात्र, काही संस्थांचा सेवाभाव संपला असून काही प्रशासकीय यंत्रणेलाच हाताशी धरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. त्यामुळे अशा संस्थांची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Notice to the camps in Beed district showing the wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.