माजलगाव धरण ओव्हर फ्लो; एक दरवाजा उघडून ४०० क्युसेकने विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 12:00 PM2022-10-07T12:00:05+5:302022-10-07T12:01:39+5:30

आणखीन पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Majalgaon dam overflow; 400 cusecs discharge starts by opening one door | माजलगाव धरण ओव्हर फ्लो; एक दरवाजा उघडून ४०० क्युसेकने विसर्ग सुरू

माजलगाव धरण ओव्हर फ्लो; एक दरवाजा उघडून ४०० क्युसेकने विसर्ग सुरू

Next

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड)
येथील माजलगाव धरण आज पहाटे १०० टक्के भरले. यामुळे सकाळी १० वाजता धरणाचा एक दरवाजा उघडून ४०० क्युसेकने सिंदफना नदी पात्रात विसर्ग करण्यात आला. यामुळे सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आत्तापर्यंत परतीच्या पावसावर हे धरण भरलेले आहे. त्याचप्रमाणे यावर्षी देखील हे धरण पैठणचे नाथ सागर धरण, कुंडलिका व सिंदफना नदी पात्रातुन आलेल्या पाण्यावर हे धरण भरायला चार महिने लागले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणात २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गुरुवारी हे धरण ९९ टक्के  झाले होते. धरण परिसरात रात्री झालेल्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून शुक्रवारी सकाळी एका गेट वाट ४०६ क्युसेकने सिंदफना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी. आर .शेख यांनी दिली.

आणखीन पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे येथील उपविभागीय अधिकारी नीलम बाफना व तहसीलदार वर्षा मनाळे यांनी सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: Majalgaon dam overflow; 400 cusecs discharge starts by opening one door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.