माजलगावात चारित्र्यावर संशय घेत चुलतीवर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:47 AM2018-04-14T00:47:00+5:302018-04-14T00:47:00+5:30

In Majalgaon, the Chulativar has blamed Charita on the basis of character | माजलगावात चारित्र्यावर संशय घेत चुलतीवर कोयत्याने वार

माजलगावात चारित्र्यावर संशय घेत चुलतीवर कोयत्याने वार

Next
ठळक मुद्दे चुलती मेली समजून पुतण्या स्वत:हून ठाण्यात हजर

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पुतण्याने आपल्या चुलत चुलतीवर कोयत्याने सपासप दोन वार केले. यामध्ये चुलती मृत झाल्याचे समजून पुतण्या स्वत:हून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. हा थरार सावरगाव येथे शुक्रवारी दुपारी घडला. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेली महिला अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.


मीरा अंगद नाईकनवरे (२८) असे जखमी चुलतीचे नाव असून अर्जून गंगाधर नाईकनवरे असे हल्ला करणाऱ्या पुतण्याचे नाव आहे. माजलगाव शहरापासून आठ कि़मी. अंतरावर असलेल्या सावरगाव येथील नाईकनवरे गल्लीत संयुक्त कुटुंब रहाते. अर्जुन नाईकनवरे याच्या बहिणीचे ५ फेब्रुवारी रोजी लग्न होते. याच लग्नात त्याची चुलती मिरा नाईकनवरे या एका व्यक्तीसोबत बोलत असल्याचे अर्जूनला दिसले. तेव्हापासून तो आपल्या चुलतीवर संशय घेत होता. वारंवार विचारणा केली, परंतु त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शुक्रवारी घरातील सर्व सदस्य बाहेर गेले होते.

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मिरा नाईकनवरे या एकट्याच टीव्ही पहात होत्या. याचवेळी येथे अर्जून आला. बाजूलाच असलेला कोयता उचलून चुलतीच्या डोक्यात पहिला वार केला. यावेळी त्या जोरात ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकून आजुबाजुचे लोक धावत आले. तोपर्यंत अर्जूनने दुसरा वार मानेवर केला आणि घटनास्थळावरुन पळ काढत थेट माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. रक्ताने कपडे माखलेल्या अवस्थेत तो ठाण्यात आल्याने पोलिसही अवाक् झाले. त्याने आपल्या चुलतीवर हल्ला केल्याचे सांगितल्यावर ग्रामीण पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले. तोपर्यंत ग्रामस्थांनी जखमी मिरा नाईकनवरे यांना माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून समजते.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके, पोलीस निरीक्षक मिर्झा बेग यांनी या प्रकाराची सर्व माहिती घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

अर्जून करतो स्पर्धा परिक्षेची तयारी
अर्जून नाईकनवरेचे एम.ए. शिक्षण झालेले आहे. सध्या तो औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. अकाही दिवसांपूर्वीच तो आपल्या गावाकडे आला होता. तेव्हापासून तो आपल्या चुलतीवर संशय घेत होता.

Web Title: In Majalgaon, the Chulativar has blamed Charita on the basis of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.