बीडमध्ये विविध उपक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:03 AM2019-06-13T00:03:07+5:302019-06-13T00:03:25+5:30

ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले.

Mahesh celebrated various activities by Mahesh in Navami Souvenirs | बीडमध्ये विविध उपक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी

बीडमध्ये विविध उपक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी

Next
ठळक मुद्देशिवप्रसाद जाजू यांचे मार्गदर्शन : संघटन शक्ती मजबुतीचे आवाहन

बीड : ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले.
बीड येथे महेश नवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महेश नवमी पर्व, माहेश्वरी सामाजाची वाटचाल आदी विषयांवर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर राजस्थानी सेवा समाजचे अध्यक्ष ओमप्रकाश जाजू, रामबिलास जाजू कळंबकर, तालुका माहेश्वरी महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी बालाजी मंदिर येथे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते महाआरती करुन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. कलशधारी महिला, बॅँड पथक, ध्वजकरी, सजविलेल्या रथात भगवान महेश प्रतिमा आदींचा समावेश होता. पेठ भागात काढलेल्या या शोभायात्रेत अमृत सारडा, नगरसेवक शुभम धुत, अ‍ॅड. ओमप्रकाश जाजू, सीए एस. पी. लड्डा, त्रिंबकदास झंवर, गोविंद लाहोटी, संतोष सोहनी, विष्णूदास बियाणी, अमर डागा, अ‍ॅड.विजयकुमार कासट, रमण बाहेती, भगीरथ बियाणी, प्रदिप चिंतलागे, जवाहर सारडा, दिनेश मुंदडा, आदींसह यजमान जाजू परिवार, युवक, युवती, महिला, पुरुष मोठ्यासंख्येने सहभागी होते.
आरोग्य तपासणी शिबीर
माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वास्थ तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.विजयकुमार कासट, डॉ.राजेंद्र सारडा, गंगाबिशन करवा, विष्णूदास बियाणी, प्रमोद मनियार, प्रमोद मंत्री, डॉ.बी.जी.झंवर आदींची उपस्थिती होती.
१०१ दात्यांचे रक्तदान
महेश नवमीनिमित्त युवा माहेश्वरीच्या वतीने आयोजित शिबिरात १०१ दात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. तर महेश परिवाराच्या वतीने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Mahesh celebrated various activities by Mahesh in Navami Souvenirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.