जीपची काच फोडून पावणेतीन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:45 AM2018-11-30T00:45:30+5:302018-11-30T00:46:32+5:30

जीपची काच फोडून आत ठेवलेली पावणे तीन लाख रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना परळी शहरात २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. महिन्यातील बॅग लंपास करण्याची ही दुसरी घटना आहे. तर दुसऱ्या बाजुला पोलिसांकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Jeep's glass breaks through a million lamps | जीपची काच फोडून पावणेतीन लाख लंपास

जीपची काच फोडून पावणेतीन लाख लंपास

Next
ठळक मुद्देपरळीतील घटना : पोलिसांकडून काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जीपची काच फोडून आत ठेवलेली पावणे तीन लाख रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना परळी शहरात २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. महिन्यातील बॅग लंपास करण्याची ही दुसरी घटना आहे. तर दुसऱ्या बाजुला पोलिसांकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संजय श्रीकिसन देशमुख (४६, रा.माकेगाव ता.अंबाजोगाई) असे रक्कम चोरीला गेलेल्या शेतकºयाचे नाव आहे. देशमुख हे त्यांच्या जीपमधून (क्र.एम.एच.४४ के.५) परळी येथील देशमुखपार या भागात आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील २ लाख ७५ हजाराची रक्कम व महाराष्ट्र बँकेचे चेकबुक आतील सीटवर बॅगमध्ये ठेवले होते. काही कामानिमित्त ते गाडीतून उतरून बाहेर पडले.
दरम्यान याच वेळी पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्यांनी जीपचा डाव्या बाजूचा पाठीमागील काच कशाने तरी फोडला आणि बॅग हातोहात लंपास केली. देशमुख यांना परतल्यावर हा प्रकार समजला. त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, परळी शहरात महिन्यापूर्वीच अशीच एक घटना घडली होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: Jeep's glass breaks through a million lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.