धनगर आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:45 AM2019-01-14T00:45:50+5:302019-01-14T00:49:08+5:30

धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.

It is necessary to pressurize the government for a comprehensive reservation | धनगर आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे गरजेचे

धनगर आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे गरजेचे

Next
ठळक मुद्देपद्मश्री विकास महात्मे : वाशिम येथे २० जानेवारी रोजी धनगर आक्रोश आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले. १३ जानेवारी रोजी बीड येथे धनगर आरक्षण आक्रोश मेळाव्यात बोलत होते.
यावेळी भाजप प्रवक्ते गणेश हाके, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवाजी राऊत, बापूसाहेब शिंदे, हरीष खुजे, गणपत काकडे, देविदास शेंडगे, अमर ढोणे, कल्याण आबूज, किशोर पिंगळे, गणेश थोरात, निर्मळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महात्मे म्हणाले की, आरक्षण कसे मिळवायचे हे मराठा समाजाकडून शिकले पाहिजे. ज्या प्रकारे मराठा समाजाचे मूक मोर्चे लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात निघाले. नागरिक पक्ष, संघटना, विचार बाजूला ठेऊन आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आले. त्याचप्रमाणे धनगर समाजाने देखील लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरायला पाहिजे. या परिस्थितीत अनेक धनगर संघटनांकडून सुपारी घेऊन समाजाची दिशाभूल केली जात आहे. भारतीय जनता पार्टीविषयी अपप्रचार केला जात आहे. मात्र, हे सरकार आल्यापासून संख्या दाखवली तरच सरकारला कळेल की आपली ताकद किती आहे व सरकारवर दबाव आणता येईल. याचसाठी २० जानेवारी रोजी वाशीम येथे धनगर समाज संघर्ष समितीसह इतर संघटनातर्फे धनगर आक्रोश आंदोलनाचे आयोजन कोले आहे. यामध्ये सर्व समाज बांधवांनी विचार, पक्ष, संघटना बाजूला ठेऊन सहभागी होण्याचे आवाहन यावेळी महात्मे यांनी केले.

Web Title: It is necessary to pressurize the government for a comprehensive reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.