अपंग लाभार्थ्यांचा निधी टक्केवारीच्या चक्कीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:36 PM2018-12-02T23:36:04+5:302018-12-02T23:37:26+5:30

दिव्यांग व्यक्तींना सामाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न होत असताना बीड जिल्हा परिषदेतील अपंग लाभार्थ्यांचा मागील वर्षाचा ३ टक्के निधी आठ महिने होऊनही वाटप न झाल्याने या लाभापासून १४३ दिव्यांग लाभार्थी वंचित राहिले आहेत.

Grant of funding percentage of disabled beneficiaries | अपंग लाभार्थ्यांचा निधी टक्केवारीच्या चक्कीत

अपंग लाभार्थ्यांचा निधी टक्केवारीच्या चक्कीत

Next
ठळक मुद्देबीड जिल्ह्यात १४३ लाभार्थी वंचित : ४२ लाख ९० हजारांच्या निधीचे आठ महिन्यानंतरही वाटप नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दिव्यांग व्यक्तींना सामाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न होत असताना बीडजिल्हा परिषदेतील अपंग लाभार्थ्यांचा मागील वर्षाचा ३ टक्के निधी आठ महिने होऊनही वाटप न झाल्याने या लाभापासून १४३ दिव्यांग लाभार्थी वंचित राहिले आहेत. जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर या निधीचे वाटप होईल  अशी आशा या लाभार्थ्यांना आहे. 
दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतानाच त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी शासन पातळीवर विविध सोयी, सवलती देण्यात आल्या आहे. यासंदर्भात विविध शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. मात्र या निर्णयाचा व योजनेचा उपयोग दिव्यांग व्यक्तींसाठी होत नसल्याचे दिसून येत आहे. २४ नोव्हेंबर २०१५ व २८ एप्रिल २०१६ च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार बीड जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून २०१७-१८ या आर्थिक वर्षात ४२ लाख ९० हजार रुपयांची तरतूद करून हा खर्च दिव्यांग लाभार्थ्यांच्या ३ टक्के निधीच्या प्रायोजनार्थ करावा अशा आशयाचा ठराव २७ मार्च २०१८ च्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला होता. 
या ठरावाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी ३१ मार्च २०१८ अखेर या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. तसेच १४३ निवड केलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना पिठाची चक्कीसाठी हा ४२ लाख ९० हजार रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत समाज कल्याण अधिकारी व सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. 
या आदेशाचे पालन तत्काळ होणे गरजेचे होते. वास्तविक पाहता ३१ मार्चनंतर सर्व प्रक्रिया होऊन हा निधी संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर डीबीटीद्वारे मिळणे अपेक्षित होते. 
मात्र समाज कल्याण विभागाच्या अक्षम्य दिरंगाई व अनास्थेमुळे मागील आठ महिन्यांपासून हा निधी अद्याप लाभार्थ्यांपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे अपंग दिन केवळ औपचारिकता म्हणून नावालाच साजरा करायचा काय, असा सवाल दिव्यांग लाभार्थी करत आहेत. 
३ टक्के अपंग निधी  योजनेंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणे आवश्यक असताना या निधीवरही काहींनी डोळा ठेवला आहे. राजकीय हस्तक्षेप करत विशिष्ट व्यक्तीकडून साहित्य खरेदी करण्यासाठी घाट घातला जात आहे. त्यामुळे अपंगांचा निधी टक्केवारीच्या चक्कीत फसला आहे. 
थेट खात्यावर निधी जमा करण्याचे आदेश
जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ च्या स्वत:च्या उत्पन्नातून ३ टक्के अपंग कल्याण निधीतून अपंग लाभार्थ्याला १०० टक्के अनुदान तत्वावर प्रती लाभार्थी ३० हजार रुपयांच्या मर्यादेत रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅँक  खात्यावर पिठाची चक्कीसाठी ४२ लाख ९० हजार रुपये निधी वाटप करण्याबाबत हे आदेश होते.
२०१६-१७ मध्ये 
कोणतीही तरतूद नाही
३ टक्के अपंग निधीनुसार २०१६- २०१७ मध्ये ३५ लाख रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला असता मात्र त्यावेळी तरतूदच केली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
तर २०१७-१८ चा निधी मंजूर होऊन त्याचे वाटप अद्याप करण्यात 
आलेले नाही

Web Title: Grant of funding percentage of disabled beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.