महावितरणच्या बंद कार्यालयाला हार घालून ग्रामस्थांचा रोष व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:26 AM2018-10-07T00:26:58+5:302018-10-07T00:27:29+5:30

तालुक्यातील उमापूर गावातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व गावांत महावितरणचे अधिकारी येत नसल्याने या त्रासाला कंटाळून गावातील नागरिकांनी शनिवारी येथील महावितरणच्या बंद कार्यालयाला गांधीगिरी पद्धतीने हार घालून निषेध आंदोलन केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Giving the defeat to the closed-door office of MSEDCL, the villagers expressed their anger | महावितरणच्या बंद कार्यालयाला हार घालून ग्रामस्थांचा रोष व्यक्त

महावितरणच्या बंद कार्यालयाला हार घालून ग्रामस्थांचा रोष व्यक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील उमापूर गावातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व गावांत महावितरणचे अधिकारी येत नसल्याने या त्रासाला कंटाळून गावातील नागरिकांनी शनिवारी येथील महावितरणच्या बंद कार्यालयाला गांधीगिरी पद्धतीने हार घालून निषेध आंदोलन केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या व सर्कलचे गाव असलेल्या उमापूर येथे विद्युत वितरण विभागाकडून गावातील विद्युत पुरवठा सतत व खंडित केला जात आहे. सध्या कडाक्याचे ऊन पडत असल्याने व वातावरणात गरमी जाणवत असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतांना दिसत आहे. त्यात वीज नसल्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून गावातील विद्युत पुरवठा वेळी-अवेळी खंडित होत आहे. त्यातच अधिकारी व कर्मचारी हे गावात येत नसल्याने शनिवारी येथील महावितरणच्या बंद असलेल्या कार्यालयाला हार घालून गांधीगिरी पद्धतीने हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुबारक शेख, विलास कुरूंद, धनगड समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेड तालुकाप्रमुख सोपान दळवी, सामाजिक कार्यकर्ते रमेश मिसाळ ,अजय आहेर, आदर्श औटी, अमोल देशमुख, हकीम शेख, अरुण बनसोडे, संतोष नवपुते, नरसिंह तुरुकमारेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यवस्थित व सुरळीत वीज पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Giving the defeat to the closed-door office of MSEDCL, the villagers expressed their anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.